शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘लोकमत’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभ्यासपूर्ण विवेचन

By admin | Updated: December 27, 2014 01:26 IST

देशात महाराष्ट्राला बनविणार रोलमॉडेल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त नाशिक शहरात प्रथमच आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास गप्पांचा कार्यक्रम ‘लोकमत’च्या व्यासपीठावर खुलला आणि शेती, सिंचनापासून ते उद्योग, शिक्षणापर्यंत अनेकविध प्रश्नांना फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना फडणवीस यांनी देशात महाराष्ट्र राज्याला रोलमॉडेल बनविण्याबाबतची आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये खास निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात फडणवीस यांची प्रगट मुलाखत लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर आणि नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी घेतली. संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या माऱ्यापुढे जराही न डगमगता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत यापुढे राज्य सरकारची नेमकी दिशा काय असेल, याचीही झलक दाखविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना दिलेली उत्तरे त्यांच्याच शब्दांत...शाश्वत शेती विकासावर भर ४सरकारचा फोकस आजवर केवळ रिलिफवर राहिलेला आहे. वातावरणातील बदल याचा मुकाबला आपण करतो आहे. मागील सरकारने पाच वर्षांत रिलिफपोटी ८ हजार कोटी रुपये, तर शाश्वत शेती विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसानीपोटी आम्ही त्यांना एक दशांशदेखील मदत देऊ शकत नाही. माझ्या मते, रिलिफ हा मुद्दा आहेच परंतु शाश्वत शेतीविकासही महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात जी गारपीट झाली त्यात ज्या शेतकऱ्यांनी आच्छादने वापरली होती, त्यांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आच्छादनांबाबत मदतीचा विचार पुढे आला. परंतु सदर आच्छादने ही इटलीतून आयात केली जातात. त्यामुळे त्याचे आयातशुल्क कमी करता येईल काय, याचा विचार आम्ही करतो आहे. वातावरणातील बदल आता वास्तविकता मानून त्यापासून होणारा त्रास थांबविण्याचा विचार करायला हवा. महाराष्ट्रातील पाच हजार गावे एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावातील पाण्याचे आॅडिट करुन उपलब्ध पाणी कसे अडवता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून पीकपाहणी करून नुकसानीचा अंदाज करता येईल काय, याचाही विचार सुरु आहे.