शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त

By admin | Updated: May 11, 2017 02:25 IST

नाशिक : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील पंचवटी शिवारात असलेल्या हॉटेल करवलीमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद पाडला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील पंचवटी शिवारात असलेल्या हॉटेल करवलीमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद पाडला आहे. पोलिसांनी हॉटेल मालकासह व्यवस्थापक व एका बंगाली तरुणीला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी पंचवटी पोलीस पथकाच्या साहाय्याने संशयास्पद हॉटेलवर धाड टाकली. यावेळी विनापरवाना विदेशी मद्यविक्रीसह वेश्याव्यवसायदेखील हॉटेलमध्ये सर्रास सुरू असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी यावेळी येथून एका २३ वर्षीय बंगाली तरुणीला ताब्यात घेतले आहे. याबरोबरच दहा हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या असून, हॉटेलमालक प्रवीण मधुकर खर्डे (४३,रा. स्वामी नारायण चौक) व्यवस्थापक नंदकिशोर नारायण पाटील (४५, रा. पंचवटी), कामगार प्रदीपकुमार शिवप्रसाद वर्मा (२९ रा. मध्य प्रदेश) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हॉटेलमध्ये विनापरवाना चालणारी मद्यविक्री आणि वेश्याव्यवसाय पुन्हा एकदा या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. महामार्गालगत असलेल्या हॉटेल संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या असून, पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बेकायदेशीरपणे केली जाणारी व्यवसायाविरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.