शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाळविहीर ग्रामपंचायतने सुरू केली पीठगिरणी

By admin | Updated: February 5, 2017 00:11 IST

अभिनव संकल्पना : नियमित कर भरणाऱ्यांना मिळणार तीस किलो दळण मोफत दळून

सुनील शिंदे घोटी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरात असलेल्या वाळविहीर परिसरात धान्य दळण्यासाठी, भात भरडण्यासाठी गिरणी नसल्याने येथील ग्रामपंचायतने अभिनव उपक्र म राबवत गावातच गिरणी टाकून ग्रामस्थांचा वेळ, श्रम व पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. नियमितपणे ग्रामपंचायत कर भरणाऱ्या ग्रामस्थांना धान्य दळण व भात भरडण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने कूपन वाटप करण्यात आले असून, यात महिन्याला तीस किलो धान्य विनामूल्य दळून दिले जाणार असल्याने ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याने विक्र मी कर गोळा झाला आहे. घोटी - वैतरणा रस्त्यावरील वाळविहीर हे छोटेसे गाव. या गावाच्या तब्बल बारा वाड्या इतरत्र विखुरल्या गेल्या आहेत. भात या प्रमुख पिकासह कडधान्य मोठ्या प्रमाणात पिकविले जाते. मात्र हे धान्य भरडण्यासाठी परिसरात एकही गिरणी नसल्याने या गावातील नागरिकांना धान्य दळण व भात भरडण्यासाठी घोटीशिवाय पर्याय नव्हता. मात्र येथील सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल लक्षात घेऊन येथील ग्रामसेवक प्रमोद ठाकरे यांनी ग्रामपंचायतमार्फत गावातच गिरणी टाकण्याची संकल्पना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. यात सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संकल्पनेला ग्रामसेवक ठाकरे यांनी मूर्त स्वरूप देत मारु तीवाडी येथे ही गिरणी सुरूही केली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेल्या या गिरणीत धान्य दळण करण्यासाठी तसेच भात भरडण्यासाठी ग्रामपंचायतकडून कूपन उपलब्ध करून देण्यात आली असून, यानुसार ग्रामपंचायत कर भरणाऱ्या ग्रामस्थाला तीस किलो धान्य मोफत दळून दिले जाणार आहे, तर त्यापुढे सवलतीच्या दरात धान्य, भात, मसाला दळून दिला जाणार आहे.  यामुळे गावातच सोय उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची या उपक्र माला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ग्रामपंचायतच्या करात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, ही  सवलत लगतच्या भावली व पिंपळगाव भटाटा या गावलाही देण्यात येणार आहे.