कळवण : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्था व नागरी बँकाच्या ठेवी संबंधित संस्थांना परत मिळाव्यात, अशी मागणी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संचालक दीपक महाजन यांनी महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक तथा राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त निबंधक सुनील पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेल्या नोटाबंदीनंतर नाशिक जिल्ह्यातील विविध पतसंस्थांच्या ठेवी पतसंस्थांची पालक संस्था असलेल्या जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अडकून पडल्या आहेत.नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे, कार्याध्यक्ष नारायण वाजे, ज्येष्ठ संचालक डॉ. सुनील ढिकले यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, विभागीय निबंधक तसेच शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (दि.२०) राज्याचे कृषी व पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक पवार यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. त्यांनी याविषयी लक्ष घालण्याचे आश्वासन देताना प्रत्यक्ष जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. लवकरच याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील असे या आश्वासन पवार यांनी दिले. कळवण तालुक्यातील काही पतसंस्थांच्या ठेवीदेखील जिल्हा बँकेत अडकल्या असून, त्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
जिल्हा बँकेतील पतसंस्थांच्या ठेवी परत मिळाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:13 IST
कळवण : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्था व नागरी बँकाच्या ठेवी संबंधित संस्थांना परत मिळाव्यात, अशी मागणी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संचालक दीपक महाजन यांनी महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक तथा राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त निबंधक सुनील पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा बँकेतील पतसंस्थांच्या ठेवी परत मिळाव्यात
ठळक मुद्देकळवण : सहकार विभागाचे अतिरिक्त निबंधक पवार यांना निवेदन सादर