शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२९ उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: March 9, 2017 00:44 IST

जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६७५ उमेदवारांपैकी २२९ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही.

संजय दुनबळे  नाशिकजिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६७५ उमेदवारांपैकी २२९ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. यात अपक्ष उमेदवारांबरोबरच पक्षीय उमेदवारांचाही समावेश आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने अनामत रक्कम गमवावी लागणाऱ्या पक्षीय उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर कॉँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. निवडणूक लढण्याची हौस अनेक इच्छुकांनी भागवून घेतली. मतमोजणीपूर्वी आपलाच विजय असल्याचा छातीठोकपणे दावा करणाऱ्यांना मतमोजणीनंतर अनेकांना अनामत रक्कमही वाचविता आली नसल्याचे स्पष्ट झाले. गणामध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या रकमेतून नोटाची (कुणीही नाही) मते वजा केल्यानंतर शिल्लक राहाणाऱ्या मतांपैकी एक अस्टमांश मते मिळालेल्या उमेदवारांनाच आपली अनामत रक्कम परत मिळत असते. जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना एवढी मते मिळालेली नाहीत. अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. गणांचा विस्तार पाहाता अपक्ष उमेदवारांना सर्वत्र आपली यंत्रणा राबविणे शक्य होत नसल्याने त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पक्षीय उमेदवारांकडे स्वत:च्या यंत्रणेबरोबरच पक्षाची यंत्रणा असतानाही त्यांना अनामत रक्कम वाचविण्याइतकी मते न मिळाल्यास पक्षावर नामुष्कीची वेळ येते.जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये एकूण ६७५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी २२९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात भाजपाच्या ३३, कॉँग्रेस २४, राष्ट्रवादी कॉँग्रेस १४, मनसे १७, शिवसेना १०, अपक्ष व इतर १३१ उमेदवारांचा समावेश आहे. अनामत रक्कम जमा होणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय आकडेवारी पाहात त्यात निफाड तालुका आघाडीवर आहे तर देवळा आणि सुरगाणा हो दोन तालुके बरोबरीत आहे.तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - सटाणा १३, चांदवड १५, देवळा ५, नांदगाव ११, कळवण १३, मालेगाव २७ दिंडोरी २०, निफाड २९, येवला २०, त्र्यंबक ११, पेठ १०, सुरगाणा ५, सिन्नर १५, इगतपुरी २४ , नाशिक ११ .