शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Updated: June 13, 2014 00:21 IST

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचा पायी दिंडी सोहळा सुरू झाला. सुमारे १५ हजार वारकरी दिंडीत सामील झाले आहे.

 

त्र्यंबकेश्वर : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचा पायी दिंडी सोहळा सुरू झाला. सुमारे १५ हजार वारकरी दिंडीत सामील झाले आहे. कुशावर्त तीर्थावर यशोदाबाई अडसरे व त्यांचे पती सुशील अडसरे यांनी पूजा केल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.तत्पूर्वी संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधी मंदिरातून डोक्यावर पादुका घेऊन समाधी संस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, संस्थेचे विश्वस्त दिंडीचे मानकरी मनू महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, भानुदास गोसावी, सुरेश गोसावी, जयंत महाराज गोसावी, देहू संस्थानचे बाळासाहेब देहूकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, सुमनताई खुळे, अ‍ॅड. विलास आंधळे, चक्रांकित महाराज आळंदीकर, राठी महाराज, कसूरचे छगन महाराज जाधव आदि उपस्थित होते.तीर्थराज कुशावर्तावर नगराध्यक्षांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर सर्वांचे स्वागत सत्कार, पाद्यपूजा व मान्यवरांचा सत्कार आदि कार्यक्रम झाले. पालखी बरोबरचे वारकरी टाळ- मृदंगाच्या तालावर तल्लीन होऊन त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत आले.देवस्थान ट्रस्टतर्फे मानकरी मान्यवरांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पालखीने प्रस्थान केले. आज वटसावित्री पौर्णिमा असल्याने पूजेसाठी सुवासिनींची लगबग चालू होती. त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवाची नगरी, सुवासिनींनी अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली. वड या वृक्षासदेखील भगवान शिवाचा अवतार मानण्याची श्रद्धा आहे. एकीकडे भाविक दिंडीने निघाले होते, तर दुसरीकडे महिलांची वटसावित्रीची पूजा सुरू होती. (वार्ताहर)