शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

विभागीय अधिकारी नावापुरतेच! नरेंद्र दंडगव्हाळ

By admin | Updated: June 12, 2014 01:21 IST

विभागीय अधिकारी नावापुरतेच! नरेंद्र दंडगव्हाळ

 

सिडकोमहापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात सुमारे दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रमुख असलेले विभागीय अधिकारी यांचा कर्मचाऱ्यांवर वचकच नाही. कोणत्याही विभागाची माहितीच नसल्याने विभागीय अधिकारी हे एक शोभेचेच पद असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.शहरातील सहा विभागांपैकी सर्वाधिक कर वसूल करणाऱ्या सिडको विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी हे कामकाज बघतात. विशेष म्हणजे, गोसावी यांनी त्यांचा नोकरीचा बहुतांशी कार्यकाळही याच कार्यालयात घालविला आहे. आजमितीला या कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम, आरोग्य, विद्युत, भुयारी गटार, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी, एक खिडकी योजना, अतिक्रमण आदि विभाग मिळून सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी काम करतात. कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची वेळ ही सकाळी ९.४५ वाजेची असून, सायंकाळी ५.४५ वाजता सुट्टी असे वेळापत्रक आहे; परंतु विभागीय अधिकाऱ्यांचा कोणताही वचक अथवा धाक नसल्याने शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच कर्मचाऱ्यांना ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती बघावयास मिळते. कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी ओळखपत्र सक्तीचे केले आहे; परंतु बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी ओळखपत्र लावतात. उशिराने कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरी मस्टरवर केव्हाही सही करता येते. मनपाशी संबंधित कामकाज करण्यासाठी सिडकोवासीय कार्यालयात येतात; परंतु कर्मचारी जागेवर नसतात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. जेवणाची सुट्टीची वेळ संपल्यानंतरही कर्मचारी उशीरा जागेवर येतात. या सर्व गोष्टींना ज्यांनी आवर घालायचा त्या विभागीय अधिकाऱ्यांकडूनच या घटनांकडे काणाडोळा केला जात असल्याचे दिसून येते.