शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना

By admin | Updated: June 24, 2016 00:31 IST

दिलासा : तहसीलदार, उपजिल्हाधिकारी बदल्या

नाशिक : तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे महसूलमंत्र्यांकडे असलेले अधिकार शासनाने आता त्या त्या विभागीय आयुक्तांना बहाल केले असून, त्याबाबतचे आदेश बुधवारी शासनाने जारी केले आहेत. या आदेशामुळे मंत्रालयातील ‘भेटी-गाठी’ संस्कृतीला चाप बसणार असल्याने अधिकारीवर्गाला दिलासा मिळाला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील ११० तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी सदर बदलीचे प्रस्ताव फेटाळून लावत प्रशासन मंडळाकडून या प्रस्तावांची छाननी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, प्रशासन मंडळानेदेखील सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ज्यांना तीन वर्षे पूर्ण झाले वा मार्च २०१७ पर्यंत तीन वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गुणवत्तेवरच आता जे खरोखर बदली पात्र आहेत, अशांच्याच बदल्या होणार असल्या तरी, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन मंडळाला डावलून थेट मंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या बदल्यांची प्रथा बंद करण्यात आली आहे. बुधवारी शासनाने या संदर्भातील अधिकार विभागीय आयुक्तांना बहाल करून तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांबाबत दरवर्षी जानेवारी महिन्यातच प्रस्ताव तयार करून ३१ मे पूर्वी बदल्या करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अशा बदल्या करताना बदल्यांच्या कायद्याचा भंग होणार नाही तसेच एखाद्या अधिकाऱ्याची विशेष कारणास्तव बदली करावयाची असेल तर त्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव सादर करावा व बदली करण्यामागच्या कारणांची मिमांसा करणे क्रमप्राप्त ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, लवकरच बदल्या होतील, अशी अपेक्षा आहे.