विंचूर : येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सतर्कतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.येथील सुभाषनगर रस्त्यावरील मोरेङ्क्तसंधान वस्तीनजीक वास्तव्यास असलेल्या आकाश संजय मोरे (१७) यास गेल्या काही दिवसांपासून ताप येत असल्याने येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र ताप कमी होत नसल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची डेंग्यू चाचणी करण्यात आली. ही चाचणी डेंग्यूसद्श आल्याने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. डेंग्यू रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून, त्यादृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन याबाबत माहिती देत आहेत. (वार्ताहर)
विंचूर येथे डेंग्यूचा रु ग्ण आढळला
By admin | Updated: September 13, 2016 00:30 IST