शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:35 IST

नाशिक : ज्याठिकाणी आरोग्याविषयी सर्वाधिक उपाययोजना आवश्यक मानली जाते, त्या जिल्हा शासकीय रुग्णालय आवार परिसरातच भंगाराच्या साहित्यात डेंग्यूची साथ पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ज्याठिकाणी आरोग्याविषयी सर्वाधिक उपाययोजना आवश्यक मानली जाते, त्या जिल्हा शासकीय रुग्णालय आवार परिसरातच भंगाराच्या साहित्यात डेंग्यूची साथ पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्याने महापालिकेने नोटीस बजावली आहे. याशिवाय, नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, पंचवटीतील एसटी आगारासह एनडी पटेलरोडवरील एसटीच्या कार्यशाळेलाही मनपाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, महापालिकेने जून महिन्यात केलेल्या तपासणीत शहरात ३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे कागदोपत्री दिसून येत असले तरी शहरात मात्र डेंग्यू डासांच्या अळ्या सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेमार्फत डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबविली जात आहे. महापालिकेची पेस्टकंट्रोल यंत्रणा, शासनासह वैद्यकीय विभागाची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. जून महिन्यात महापालिकेच्या पेस्टकंट्रोलमार्फत ७९ हजार ४५२ घरांची तपासणी करण्यात आली असता ३३५ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. दीड महिन्यात २६ रुग्णशहरात १ जानेवारी ते १६ जुलै या कालावधीत १४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली होती. यंदा आतापर्यंत ४० रुग्णांना लागण झाल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय विभागाने दिली. गेल्या दीड महिन्यात ८२ संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली असता २६ रुग्णांना लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.  सातपूरमध्ये ११३, नाशिकरोडमधील ८६, सिडकोतील ५६, पूर्वमधील ४५, पश्चिममधील २१, तर पंचवटीतील १४ घरांचा समावेश आहे. सातपूर व नाशिकरोडमध्ये अळ्या सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय, ६३ हजार ९६१ पाण्याचे साठे तपासण्यात आले असता ३७५ पाणीसाठ्यात अळ्या निदर्शनास आल्या.  महापालिकेच्या तपासणी मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालय आवारातील भंगार साहित्यातही डेंग्यूच्या एडीस जातीच्या डासांच्या अळ्या आढळून आल्याने मनपाने नोटीस बजावली असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय विभागाने दिली. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेत शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये व्यापक तपासणी करण्यात आली.