शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोलचा घोळ ठरला डेंग्यूला कारक

By admin | Updated: August 19, 2016 00:33 IST

अडीच वर्षांनंतर ठेका : धूर व औषध फवारणी नावापुरता, नवा ठेकाही वादातच

 नाशिक : महापालिका हद्दीतील कोणत्याही प्रभागातील कोणाही नागरिकाला अथवा स्थानिक नगरसेवकांची एकच ओरड असते, ती म्हणजे ‘आमच्या भागात धूर व औषध फवारणी होत नाही आणि फवारणीवाला कधी नजरेस पडला नाही’. आरोग्य विभाग मात्र छातीठोकपणे फवारणीचा दावा करत आला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मुदतवाढीतच अडकलेला आणि विविध कारणांनी वादात सापडलेला पेस्ट कंट्रोलचा ठेका न्यायालयाच्या आदेशानंतर नव्या ठेकेदाराच्या हाती सोपविण्यात आला असला तरी पेस्ट कंट्रोलच्या घोळामुळेच शहरात डेंग्यूच्या आजाराचा कधी नव्हे इतका सामना नाशिककरांना करावा लागला आहे. महापालिकेने नव्याने ठेका दिला असला तरी त्याला चिकटलेला वाद अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे येत्या काळात पेस्ट कंट्रोलचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील पेस्ट कंट्रोलची सूत्रे एकाच ठेकेदाराकडे होती. महापालिका सुमारे ६५ लाख रुपये दरवर्षी धूर व औषध फवारणीवर खर्च करत होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून सदर ठेकेदाराला तब्बल अठरा वेळा मुदतवाढ देण्याचा विक्रम नाशिक महापालिकेत घडला. २०१४ मध्ये शहरात कधी नव्हे इतका डेंग्यूचा उद्रेक झाला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी डेंग्यूच्या उद्रेकास मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला वारंवार मुदतवाढ देण्याच्या नादात डासप्रतिबंधक धूर व औषध फवारणीत ९६ दिवसांचा खंड पडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी डेंग्यूच्या आजाराने सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेच्या पतीचा बळी गेल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली होती. नगरसेवकांनी डेंग्यूविषयक स्वतंत्र महासभा बोलाविण्यास महापौरांना भाग पाडले होते. त्यावेळी पाच तास चर्चा होऊन नगरसेवकांनी पेस्ट कंट्रोलबाबत होणारी हेळसांड आणि संबंधित ठेकेदारावर आरोप करत प्रशासनाला लक्ष्य केले होते. डेंग्यूने शहरात थैमान घातले असतानाच त्यावेळी डॉ. गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत कडक नियमावली तयार करण्याचे सूतोवाच केले. त्यासाठी काही वेळ देण्याची विनंतीही त्यांनी सभागृहाला केली होती. तोपर्यंत आहे त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सहा-सात महिन्यांच्या कालावधीनंतर आयुक्तांनी नियमावली तयार करत सदरचा प्रस्ताव आॅगस्ट २०१५ मध्ये स्थायीवर ठेवला होता. आयुक्तांनी पेस्ट कंट्रोलचा २० कोटी रुपयांचा ठेका तीन वर्षांसाठी देण्याचे प्रस्तावित केले, परंतु स्थायीने या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे सांगत प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत बरेच ‘रामायण’ घडले. ठेक्याचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत जाऊन पोहोचला, तसाच तो न्यायालयातही गेला. जून २०१६ मध्ये पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत न्यायालयाने निर्देश देत आयुक्तांकडे अधिकार सोपवले आणि मे. दिग्विजय एंटरप्रायजेसच्या पदरात ठेका पडला. गेल्या ८ आॅगस्टपासून सदर ठेकेदाराने पश्चिम विभाग वगळता शहरातील सहाही विभागात काम सुरू केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. ठेकेदारांकडून पेस्ट कंट्रोलचे काम केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी अनेक भागात धूर व औषध फवारणी होतच नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. शिवाय, सदर फवारणीमुळे डास नष्ट होत नसल्याने औषधांची मात्रा कमी पडत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे जेथे फवारणी केली जात असेल ती केवळ नावापुरताच होत असल्याचा आरोप नागरिक सातत्याने करत आले आहेत. गेल्या अडीच वर्षांत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत जो काही घोळ घातला गेला त्याचे दुष्परिणाम नाशिककर डेंग्यूच्या माध्यमातून भोगत आले आहेत. आजवर डेंग्यूने जे काही बळी घेतले आहेत त्याला जबाबदार महापालिकेची आरोग्य यंत्रणा तर आहेच शिवाय पेस्ट कंट्रोलसारख्या आरोग्याशी निगडित ठेक्याविषयी घोळ घालणारे लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. मुदतवाढीच्या घोळात पेस्ट कंट्रोलमध्ये अधून-मधून पडलेला खंड आणि फवारणीबाबत वाढत्या तक्रारी यामुळे डेंग्यूने जो काही मुक्काम ठोकला तो आजतागायत कायम आहे.(क्रमश:)