शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा मुक्काम हटता हटेना!

By admin | Updated: August 18, 2016 01:12 IST

नाशिककर हैराण : उपाययोजनांमध्ये मनपाची आरोग्य यंत्रणा थिटी

 नाशिक : यापूर्वी डेंग्यूच्या आजाराची तीव्रता नाशिककरांनी कधी अनुभवलेली नव्हती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूने शहरात मुक्काम ठोकलेला असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा थिटी पडली आहे. स्वच्छ पाण्यात एडिस एजिप्ताय जातीच्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूची लागण होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत घरभेटी देण्याचा कार्यक्रम राबविला जातो. परंतु, अपुरे मनुष्यबळ पाहता सदर घरभेटी केवळ औपचारिकताच दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते १५ आॅगस्ट या साडेसात महिन्यांच्या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद वैद्यकीय विभागात असली तरी प्रत्यक्ष आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.डेंग्यूचा मुक्काम हटता हटेना!नाशिककर हैराण : उपाययोजनांमध्ये मनपाची आरोग्य यंत्रणा थिटीनाशिक : यापूर्वी डेंग्यूच्या आजाराची तीव्रता नाशिककरांनी कधी अनुभवलेली नव्हती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूने शहरात मुक्काम ठोकलेला असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा थिटी पडली आहे. स्वच्छ पाण्यात एडिस एजिप्ताय जातीच्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यूची लागण होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत घरभेटी देण्याचा कार्यक्रम राबविला जातो. परंतु, अपुरे मनुष्यबळ पाहता सदर घरभेटी केवळ औपचारिकताच दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते १५ आॅगस्ट या साडेसात महिन्यांच्या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद वैद्यकीय विभागात असली तरी प्रत्यक्ष आकडा अधिक असण्याची शक्यता आहे.शहरात डेंग्यूच्या आजाराने कधीही प्रदीर्घ काळ मुक्काम ठोकल्याचे उदाहरण नाही. सन २०१३ पासून शहरात डेंग्यूच्या आजाराची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी ५९७ रुग्णांपैकी २५१ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाली होती तर पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. २०१४ मध्ये मात्र डेंग्यूच्या आजाराची भयावहता वाढली. वर्षभरात १०८७ रुग्ण संशयित म्हणून आढळून आले होते, तर ४६० रुग्णांना डेंग्यूची लागण होऊन ७ जणांचा बळी गेला होता. याच काळात पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरून महापालिकेत घोळ सुरू झाला होता. सन २०१५ मध्येही डेंग्यूचा मुक्काम कायम राहिला. यावर्षी ९३९ संशयितांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ३२८ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. यंदा जानेवारी ते १५ आॅगस्ट २०१६ या कालावधीत ३४१ रुग्णांना डेंग्यूने पछाडल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने डेंग्यूच्या आजाराचा सामना नाशिककर करत आले आहेत, परंतु त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा जशी अपयशी ठरली तशी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीही कमी पडली. डेंग्यूच्या आजाराविषयी महासभांमध्ये केवळ चर्चांचे फड रंगविले गेले, परंतु त्या तुलनेत प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यात आरोग्य व वैद्यकीय विभागाची यंत्रणा थिटी पडली. यावर्षी तर डेंग्यूबरोबरच शहरात वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या आजारांचाही सामना नाशिककरांना करावा लागतो आहे. यंदा कधी नव्हे एवढा डासांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागला आहे. राजकीय पक्ष-संघटना, लोकप्रतिनिधींनी आरोग्याधिकाऱ्याला मच्छरदाणी, महापौरांना कचऱ्याची फोटोफ्रेम देत या आजाराच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधितांची आंदोलनेही केवळ फोटोसेशनपुरताच मर्यादित राहिली. ठोस उपाययोजनेत मात्र महापालिकेचा आरोग्य व वैद्यकीय विभाग अजूनही चाचपडतोच आहे. (क्रमश:)