शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेतर्फे निदर्शने

By admin | Updated: May 10, 2016 22:45 IST

पिंपळगाव बसवंत : कांद्याला हमीभाव द्या

पिंपळगाव बसवंत : कांदा पिकाला मिळणाऱ्या मातीमोल भावाच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास नाफेड कार्यालय पिंपळगाव बसवंत येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निर्देशने करून निवेदन दिले. गेल्या दोन वर्षापासून पावसाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल आहेत. जी थोडीफार पिके आली त्यांना अवकाळी पाऊस, गारपीट यांना सामोरे जावे लागले. यावर्षी कांद्याचे पीक बऱ्यापैकी आले होते. मात्र या कांदा पिकाची खरेदी व्यापारीवर्ग अतिशय कमी भावाने करीत आहे. या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, वाहतूक खर्चदेखील भरून निघत नाही. शेतकऱ्यांना सर्व कांदा शासनाने नाफेडमार्फत २२०० रुपये क्विंटल दराने विकत घ्यावा, त्याचे वितरण सरकारने करावे तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्च, अधिक जीवन जगण्याचा खर्च म्हणून ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाफेड कार्यालय पिंपळगाव बसवंत येथे निदर्शने करण्यात आली.याप्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. किसन गुजर, कार्याध्यक्ष सुनील मालुसरे, चांदवड तालुका सेक्रेटरी तुकाराम गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष हनुमंत गुंजाळ, देवळ्याच्या आशाबाई जाधव, रमेश चौधरी, जयराम गावित आदिंसह चांदवड, देवळा, निफाड, नांदगाव, सुरगाणा आदि तालुक्यातील हजारो किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)