शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे १४१० कोटींचे अंदाजपत्रक स्थायीला सादर

By admin | Updated: April 17, 2017 18:30 IST

अस्तित्वातीलच मालमत्ता व प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

नाशिक : नाशिक महानगरपालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता कोणत्याही नव्या संकल्पना अथवा प्रकल्पांची मांडणी करण्याचे धाडस न दाखवता अस्तित्वातीलच मालमत्ता व प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रभारी आयुक्त बी. राधाकृष्णन् यांनी सोमवारी (दि.१७) स्थायी समितीला सादर केले. अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीसाठी मिळकतकरात सुमारे १४ टक्के तर पाणीपुरवठा करामध्ये ५ टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षण समितीसाठी ५५ कोटी तर वृक्षप्राधिकरण समितीसाठी ५२.८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे सुमारे दोन महिने विलंब झालेले सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांना सादर करण्यात आले. आता येत्या गुरुवारी (दि.२०) स्थायी समितीने अंदापत्रकावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविली आहे. महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी कार्यभार सांभाळणारे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी अंदाजपत्रक सादर केले. आयुक्तांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे १४०२.४६ कोटी रुपयांचे सुधारित आणि ५.९८ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सादर करतानाच सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले. मागील वर्षी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर झाले होते. प्रत्यक्ष जमा मात्र १४०२.४६ कोटी रुपये झाले. यंदा अंदाजपत्रकात गतवर्षाच्या तुलनेत ५१.११ कोटींनी वाढ सुचविलेली आहे.