१४ एप्रिलपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. १४ मे रोजी रमजान ईद होणे अपेक्षित आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या वेतनापासून वंचित आहेत. लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची ईद अंधारात जाणार आहे. पवित्र रमजान ईदनिमित्त एप्रिलचे वेतन ईदपूर्वी ५ मेला अदा करण्यात यावे. पवित्र रमजान महिना व ईद निमित्त मुस्लीम बांधवांना बरीचशी खरेदी व तयारीसाठी पैशांची गरज असते. सणाच्या वेळी शिक्षकांना आर्थिक त्रास होऊ नये, यासाठी मार्च महिन्याचे वेतन त्वरित आणि एप्रिलचे वेतन ईदपूर्वी अदा करावे. त्यासाठी वेळेवर तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत यासाठी शालार्थ वेतन तयार करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळेवर बिल तयार करण्यास सांगावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रमजान ईदपूर्वी वेतन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST