शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अर्ली द्राक्षाच्या निर्यातीचे नियोजन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक कोरोनाची साथ असल्यामुळे ऑनलाईन पार पडली. पालकमंत्री छगन भुजबळयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. ...

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक कोरोनाची साथ असल्यामुळे ऑनलाईन पार पडली. पालकमंत्री छगन भुजबळयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. कृषीमंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बोरसे, दिलीप बनकर ,जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी सहसंचालक संजीव पडवळ , कृषी अधीक्षक विवेक सोनवणे तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी व शेतीशी संबंधित इतर विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सभेस उपस्थित होते.

आमदार बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मांडले. त्यामध्ये प्रामुख्याने अर्ली द्राक्ष पिकास विमा कवच देण्यात यावे, हवामान आधारित डाळिंब फळ पीक विमा योजनेतील जटिल अटी शिथल करण्यात याव्यात, बागलाण तालुक्यासाठी कांदा चाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण या शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय व गरजेच्या योजना आहेत यासाठी वाढीव लक्षांक देण्यात यावा, कृषी विभागाच्या योजना महाडीबीटी पोर्टलमार्फत राबविण्यात येत आहेत. या पोर्टलमध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जावे लागते तेथे कालापव्यय होतो व पैसेदेखील खर्च होतात यामध्ये सुटसुटीतपणा आणावा, तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्याबाबत बँकांना सूचना देण्यात याव्यात, आदिवासीबांधवांना वनपट्टे देण्यात आलेले आहेत परंतु वनपट्ट्यातील जमिनीचे क्षेत्र हे वाहितीखालील क्षेत्रांमध्ये गणले जात नाही त्यामुळे आदिवासी भागांमध्ये खतांची मागणी करताना वनपट्टाधारक जमिनीचा देखील विचार करून मागणी करावी जेणेकरून हंगामामध्ये तुटवडा भासणार नाही, तसेच बागलाण तालुका हा अर्ली द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे. अर्ली द्राक्षामुळे देशास परकीय चलन मिळते परंतु पूर्वहंगामी द्राक्ष घेत असताना साधारणपणे जुलै ते डिसेंबर या कालावधीत कोरोनामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते, त्या अडचणी दूर करण्यात याव्यात, अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या बोरसे यांनी केल्या.

पालकमंत्री भुजबळ व कृषीमंत्री भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.