सिन्नर : अल्पवयीन मुलांचे गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले असल्याने बालगुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वर्षांहून १४ वर्षे करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे.बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना अज्ञानी कसे म्हणावे, असा मुद्दा उपस्थित करत भारतीय दंडसंहितेनुसार १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या गुन्हेगारांना अज्ञानी समजून कमी प्रमाणात शिक्षेची तरतूद रद्द करावी. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसण्यासाठी बालगुन्हेगारांची सध्या अस्तित्वात असलेली वयोमर्यादा १४ वर्षे करण्याची मागणी कोतवाल यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागरराव, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे यांना पाठविणार असल्याचे कोतवाल यांनी म्हटले आहे.(वार्ताहर)
बालगुन्हेगारांची वयोमर्यादा घटविण्याची मागणी
By admin | Updated: October 13, 2016 23:08 IST