शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात तब्बल १३५ कोरोनाबाधित गर्भवतींचे बाळंतपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असताना कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित गर्भवतींसाठी सज्ज ...

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असताना कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित गर्भवतींसाठी सज्ज ठेवलेला जिल्हा रुग्णालय कक्षातील स्वतंत्र कक्ष पुन्हा भरलेला आहे. गत एप्रिल ते मार्चअखेरपर्यंतच्या वर्षात जिल्हा रुग्णालयात तब्बल १३५ कोरोनाबाधित गर्भवतींचे बाळंतपण सुखरूपपणे पार पडले आहे.

गर्भवती महिलांच्या आणि वॉर्डमधील सर्व गर्भवतींच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी गत वर्षापासूनच त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात येत आहे. त्यात कोरोना चाचणीत बाधित आढळणाऱ्या महिलांसाठी जिल्हा रुग्णालयातच स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, त्यात तब्बल २० बेड ठेवण्यात आले आहेत. तिथे आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष कक्षात दाखल होणाऱ्या गर्भवती कोरोनाबाधित महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तसेच अन्य सर्व स्टाफचीही स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली. गत वर्षभरात कोरोनाबाधित १३७ महिलांची डिलिव्हरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. त्यात केवळ दोन अपवाद वगळता अन्य सर्व महिला सुखरूपपणे बाळंत होऊन तसेच कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतल्या आहेत.

इन्फो

७४ महिलांची नॉर्मल, ६३ सिझर

कोरोनाच्या गंभीर रुग्णांप्रमाणेच जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दोन महिन्यांमध्ये तर काही दिवस हे २० बेड्सही अपुरे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याप्रमाणेच मार्च आणि एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा बेड अपुरे पडण्याची स्थिती निर्माण होत आहे. आतापर्यंत झालेल्या १३७ महिलांच्या डिलिव्हरीदरम्यान गत वर्षभरात ७४ महिलांची नॉर्मल तर ६३ महिलांची सिझर डिलिव्हरी करण्यात आली.

इन्फो

मातांकडून कृतज्ञता

कक्षातील स्टाफने सर्व परिस्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळल्यामुळेच त्या स्थितीतही सर्व महिला कोरोनामुक्त होण्यासह त्यांची बालकेही निरोगी जन्माला आली. त्यामुळे या सर्व बाधित महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉयचे आभार मानून या सेवेबद्दल ऋण व्यक्त करतात.

कोट

या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने अत्यंत प्रभावीपणे काम केल्यामुळेच गत वर्षभरापासून कोरोनाबाधित महिला दाखल झाल्या. त्यातील दोन अपवाद वगळता अन्य सर्व महिला सुखरूपपणे प्रसूत झाल्या. विशेष म्हणजे, या १३५ महिलांची बाळेही सुखरूप आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची कोरोनाची बाधा आढळून आली नाही.

- डॉ. गणेश गोसावी, स्त्रीरोग विभागाचे तज्ज्ञ