शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

By admin | Updated: January 14, 2016 22:30 IST

दोडी ग्रामीण रुग्णालय : एक पद रिक्त, तर दोन वैद्यकीय अधिकारी गेले काम सोडून

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात एकमेव असणाऱ्या दोडी ग्रामीण रुग्णालयात चारपैकी केवळ एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम करताना कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्यासह आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराची शासनाने त्वरित दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर व तालुक्यात एकमेव ग्रामीण रुग्णालय दोडी बुद्रुक येथे कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. सध्या येथे डॉ. सी. ए. पाटील नामक केवळ एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून त्यांच्याकडेच जुलै महिन्यापासून वैद्यकीय अधीक्षकांचा अतिरिक्त पदभार आहे. वैद्यकीय अधीक्षक पद सहा महिन्यांपासून रिक्त असून दोन वैद्यकीय अधिकारी आठवड्याभरापासून कार्यरत नाही. त्यामुळे चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम केवळ एकाला करावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज रुग्ण तपासणीसाठी मोठी गर्दी असते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, बाळंतपण, सर्पदंश, विषबाधा, श्वानदंश, अपघात व इतर रुग्ण, शालेय आरोग्य तपासणी व विविध आरोग्य शिबिरे घेण्यात येतात. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला २४ तास सर्व कामे करणे शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे साहजिकच वैद्यकीय व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. दैनिक तपासणी करण्यासह दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येते. सिन्नर एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातात ठार होणाऱ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयातच आणण्यात येते. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कामे सांभाळणे शक्य नसल्याचे दिसते. नाशिक-पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त असून १०८ रुग्णवाहिका असल्याने जखमी रुग्ण प्राथमिक उपचारासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात आणले जातात. या पार्श्वभूमीवर येथे गैरसोय निर्माण होते. डॉ. पाटील यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना रुग्ण तपासणीसह विविध बैठकांना सिन्नर व नाशिक येथे हजर राहावे लागते. दररोज सुमारे १५० रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होते.उपचारासाठी रुग्ण दवाखान्यात अ‍ॅडमिट असतात. पोलिसांकडून वैद्यकीय तपासणीसाठी संशयित आरोपींना आणले जाते. केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे वैद्यकीय यंत्रणा कोलमडली असल्याचे चित्र आहे. दोडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्ते पदे तत्काळ भरण्याची मागणी सरपंच लीलाबाई सांगळे, उपसरपंच सुदाम वाघचौरे, गणपत केदार, रघुनाथ आव्हाड, शरद शिंदे, सखाराम दराडे, ज्ञानेश्वर आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)