शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मागणी कमी झाल्याने औष्णिक वीजनिर्मितीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

एकलहरे : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील ...

एकलहरे : राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरवठ्याअभावी संच बंद आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची निकड, ऑक्सिजन प्लांटची उभारणी, त्यासाठी अखंडितपणे वीजपुरवठा करणे गरजेचे होते. उन्हाच्या वाढत्या उकाड्याने विजेचा घरगुती व कार्यालयांतील वापर, शेतीच्या खरीप हंगामाच्या कामांची लगबग यामुळे औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर वाढल्याने गेल्या पंधरवड्यात विजेची मागणी २४ हजार मेगावॉटपर्यंत गेली होती. मात्र सद्याचे पावसाळी वातावरण, काही प्रमाणात लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग, घरगुती व शेतीसाठी लागणाऱ्या विजेची मागणी कमी होऊन १६ हजार मेगावॉटपर्यंत येऊन ठेपली आहे. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला आहे. दुसरीकडे पाण्याच्या पुरेशा साठ्याने जलविद्युत केंद्रांचा सपोर्ट मिळाल्याने औष्णिकची वीजनिर्मिती कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी झिरो शेड्युल, कोळशाची समस्या, वार्षिक देखभाल दुरुस्ती या कारणांमुळे काही संच बंद ठेवावे लागत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून मंगळवारी दुपारपर्यंत विजेची निर्मिती घटली आहे.

चौकट===

केंद्रनिहाय वीजनिर्मितीत घट

* नाशिक- १२३ (क्षमता ६३०)

* कोराडी-८५३ (क्षमता २४००)

* खापरखेडा- ६३० (क्षमता १३४०)

* पारस- १४० (क्षमता ५००)

* परळी- शून्य (क्षमता ११७०)

* चंद्रपूर- ११६८ (क्षमता २९२०)

* भुसावळ- ५३५ (क्षमता १२१०)

* उरण- शून्य (क्षमता ४३२)