शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याच्या राजवस्र पैठणीला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:53 IST

येवला : शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला जीएसटीमुळे उतरती कळा लागली असून, कच्च्या मालाच्या किमतीवर जीएसटी लागू झाल्याने विणकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला जीएसटीमुळे उतरती कळा लागली असून, कच्च्या मालाच्या किमतीवर जीएसटी लागू झाल्याने विणकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. व्यापारी उत्पादकाने विकलेल्या पैठणीला जीएसटी लागू करून पैठणीचे  भाव वाढवून देत नसल्याने विणकरांची दुहेरी कुचंबणा सुरू झाली आहे.पैठणी विणकर संघटित नसल्याने व्यापारी याचा फायदा घेत असल्याची चर्चा सध्या विणकर बांधवांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पैठणीवर लागू केलेला जीएसटी कर रद्द करावा किंवा उत्पादकाने विकलेल्या पैठणीवर जीएसटी लागू करून भाव द्यावा, अशी मागणी विणकर करत आहेत. याबाबत विणकरानी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्राच्या तत्कालीन शासनकर्त्यांनी यादव साम्राज्य व पेशवे काळात पैठणी महावस्राला राजाश्रय होता म्हणूनच हे महावस्र आजही टिकाव धरून आहे. ही कला टिकावी म्हणून सन १९८० मध्ये बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना नाशिक जिल्ह्यातील येवला व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील विणकर बांधवांच्या विनंतीवरून शासनाने पैठणीकरिता लागणाऱ्या कच्च्या मालावरील सर्व प्रकारचे कर  विशेष बाब म्हणून लागू केलेले  नव्हते. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारांनी वेळोवेळी पैठणी टिकावी व विणकर जगावा म्हणून अनुदान देणे अथवा विविध योजना राबविण्यासारखे अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे युनेस्कोने या महावस्र पैठणीला वर्ल्ड हेरिटेज आयकॉन दिला आहे.