शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोविड सेंटर करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:15 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयत्या विषयांवर चर्चा करताना जवळपास ...

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयत्या विषयांवर चर्चा करताना जवळपास सर्वच सदस्यांनी ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. आत्माराम कुंभार्डे यांनी ग्रामीण व शहरी भागात कोठेही रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नसल्याचे सांगून भविष्यात हीच परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे सांगितले. रुग्णांना दाखल करण्यास जागा तर नाहीच परंतु त्यावर उपचार म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनही मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. तर अध्यक्ष क्षिरसागर यांनी ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांची तयारी असेल तर त्यांना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यास हरकत नसल्याचे सांगितले किंवा खासगी रुग्णालयातील ५० ते ६० टक्के खाटा राखीव ठेवता येतील काय याचीही चाचपणी करण्याची सूचना केली.

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले असले तरी, ते अपुरे पडू लागल्याने सर्वच प्रा‌थमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करून रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. त्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य खरेदीस जिल्हा परिषदेने मान्यता द्यावी अशी सूचना कुंभार्डे यांनी केली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये तशी व्यवस्था केल्यास नॉनकोविड रुग्णांची गैरसोय होणार असल्याचे सांगितले. त्यापेक्षा ज्या तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या अधिक आहे त्या तालुक्यात अधिकाधिक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा प्रकारची सोय करता येऊ शकेल. त्यासाठी आजच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

चौकट

सावरगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई

येवला तालुक्यातील सावरगाव प्रा‌थमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असतानाही दोघे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याची तर एक वैद्यकीय अधिकारी अनधिकृत गैरहजर असल्याची तक्रार सविता पवार यांनी केली असता, अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस बजावून त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर यांनी सांगितले.