शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

सटाणा राष्ट्रवादीत वाद

By admin | Updated: February 5, 2017 23:56 IST

जिल्हा परिषद निवडणूक : रविवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड

सटाणा : जिल्हा परिषद निवडणुकीत बागलाण तालुक्यातील जायखेडा गटात तिकीट मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती.मात्र रविवारी दुपारी अचानक पगार यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी प्रबळ दावेदारी केली होती .मात्र अचानक तिकीट कापले गेल्याने पक्षांतर्गत नवीन वादाला तोंड फुटले आहे.  बागलाण तालुक्यातील जायखेडा गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे पगार यांनी भामरे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. पगार, माजी आमदार संजय चव्हाण यांनी तिकिटासाठी शब्द दिल्यामुळे भामरे यांनी प्रचाराला सुरु वात देखील केली होती. तिकीट आपल्यालाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष पगार यांचे भाऊबंद यतीन पगार यांनी कामांच्या जोरावर तिकीट आपल्यालाच मिळणार असे छातीठोक पणे सांगत थेट हायकमांडकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली होती.  दरम्यान तिकीट आपल्यालाच मिळणार म्हणून शनिवारी मनीषा व महेंद्र या भामरे दाम्पत्याने वाजत गाजत पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आज रविवारी दुपारी जिल्हापरिषद सदस्य यतीन पगार यांनी देखील वाजत गाजत पक्षाचा व अपक्ष उमेदवारी अर्ज भरून अचानक अर्जाला एबी फॉर्म जोडल्याने कार्यकर्ते आवक झाले.  गेल्या मिहना भरापासून तिकिटासाठी सुरु असलेल्या लढाईत पगार यांनी बाजी मारल्याने अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह अन्य पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर नसतांना यतीन पगार यांनी थेट एबी फॉर्म जोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या चिठ्ठीवर पगार यांनी शनिवारी रात्रीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून कोरा एबी फॉर्म मिळविला असल्याची चर्चा सुरु आहे.  जिल्हाध्यक्ष पगार यांनी भामरे यांना तिकीट मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असतांना अचानक भामरे यांचे तिकीट कापल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये एन निवडणुकीत दुफळी झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी संदर्भात तालुकाध्यक्ष भामरे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)