शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

By admin | Updated: June 19, 2015 00:12 IST

पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल‘त्या’ विवाहितेचा मृत्यू

नाशिक : पतीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने रॉकेल ओतून पेटवून देण्यात आलेल्या हिरावाडीतील विवाहितेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अरुणा जितेंद्र जाधव (रा. बनारसी नगर, हिरावाडी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी पती जितेंद्र पंढरीनाथ जाधव, भावजय सरला जाधव यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या रविवारी (दि.१४) घडलेल्या घटनेनुसार रात्री १० वाजेच्या सुमारास अरुणा जाधव यांनी फोन उचलला नाही या कारणावरून कुरापत काढून पती जितेंद्र जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अंगावर रॉकेल ओतले, तर जाऊ सरला ज्ञानेश्वर जाधव हिने काडी लावून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेत अरुणा जाधव गंभीरपणे भाजल्या गेल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर अरुणा जाधव यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. त्यांनी सुरुवातीला दिलेल्या जबाबात बदल करीत पती व त्यांच्या भावजयमध्ये असलेल्या अनैतिक संबंधातून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितल्याने पती व जाऊबाई यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)