नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या देवळा तालुक्यातील मेशी येथील इसमाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला़ मयत इसमाचे नाव धर्मा नागू पगार (वय ५४) असे आहे़ मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयातून पगार यांना शनिवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़ देवळा तालुक्यातील मेशी येथील धर्मा नागू पगार यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (दि़५) दुपारी मृत्यू झाला़ त्यांचा तपासणी अहवाल रुग्णालयास प्राप्त झालेला नाही़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये सहा रुग्ण उपचार घेत आहेत़ त्यामध्ये चार महिला, पुरुष व लहान मुलाचा समावेश आहे़ चार महिलांपैकी तीन महिलांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एक महिला, एक पुरुष व लहान मुलाचा अहवाल येणे बाकी आहे़ (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूसदृश आजाराने मेशी येथील इसमाचा मृत्यू
By admin | Updated: April 6, 2015 00:38 IST