शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पाइपलाइनमधील मृत बोकड सभेत गाजला

By admin | Updated: December 1, 2015 22:58 IST

जलसंधारण समिती बैठक : उपअभियंत्यांची रजा ‘अनधिकृत’

नाशिक : देवळा ९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइनमध्ये आढळून आलेला मृत बोकड जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत गाजला. स्थायी समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली.जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन आणि जलसंधारण समितीची मासिक बैठक (दि.१) रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड तसेच पाणीपुरवठा लघुपाटबंधारे विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत संगीता ढगे यांनी दिंडोरी तालुक्यातील तीन बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव ठेवल्याबाबत चर्चा केली. त्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. राजेश नवाळे यांनी मनेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरवस्थेबाबत विचारणा करीत या योजनेवर लाखो रुपये खर्च होऊनही ग्रामस्थांना पिण्यास पाणी उपलब्ध होत नसल्याकडे लक्ष वेधले. सदस्य नितीन पवार यांनी देवळा नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत असलेल्या पाइपलाइनमध्ये मृत बोकड सापडल्याबाबत वृत्तपत्रात माहिती आल्याचे व त्याबाबत नक्की वास्तव परिस्थिती काय असल्याची विचारणा केली. त्यावर या योजनेचे उपअभियंता यांनी या पाइपलाइनमध्ये बोकड नव्हे तर अज्ञात पक्षी मृत आढळून आल्याचे व संपूर्ण पाइपलाइनची स्वच्छता व साफसफाई करण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत लघुपाटबंधारे विभागाचे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे बहुतांश उपअभियंता अनुपस्थित असल्याबाबत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी विचारणा केली. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सर्व अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित असलेल्या सर्व उपअभियंत्यांची रजा अनधिकृत ठरविण्यात येईल, त्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)