शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रंगीबेरंगी पतंगांनी सजली बाजारपेठ

By admin | Updated: January 2, 2016 23:59 IST

रंगीबेरंगी पतंगांनी सजली बाजारपेठ

महेश पगारे  नाशिकमकर संक्रांत सणाचे खास आकर्षण पतंग असून, त्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बाजारपेठेत नायलॉन मांजाला बंदी असल्याने इतर मांजांची मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली आहे. कॉटन मांजामध्ये सुरती, बरेली, मैदानी, सुरती पांडा, बरेली पांडा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मांजा नऊ तार, बारा तार व सोळा तारमध्ये उपलब्ध आहे. मांजाची किंमत मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. १०० ते ४०० रुपयांपर्यंत मांजाची किंमत आहे. मांजाचे रीळ विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. मांजाची लांबी १००० मीटरपर्यंत उपलब्ध आहे. या रीळमध्ये बाजारपेठेत आसारी पहायला मिळत नाही. प्लास्टिक रीळ उपलब्ध आहे. बाजारात प्लास्टिकपासून तयार केलेल्या फॅन्सी पतंगाला मागणी आहे. पतंगाचे खास आकर्षण लहान मुलांना असल्याने कार्टून्समध्ये भीम, मोटू पतलू, टॉम अ‍ॅण्ड जेरीचे पतंग बाजारात जास्त प्रमाणात दिसत आहे. गरुड, कबुतर व घार यांच्या आकारातील पतंग लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे. सिनेकलावंतांच्या प्रतिमांमध्येही पतंग उपलब्ध असल्याने आकर्षण ठरत आहे. यंदाचे खास आकर्षण मोदी पतंग आणि इको फ्रेंडली हॉट बलून ठरत आहे. मोदींच्या विविध प्रतिमांचे पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. पर्यावरणाला अनुसरून इको फ्रेंडली कंदिलाच्या आकारातील पतंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पतंगातून पर्यावरण रक्षणाचा संदेश जाईल, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करत आहेत. याचबरोबर येवल्याचे प्रसिद्ध धोबी पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. युवकांच्या मागणीनुसार विविध आकारांतील पतंग तयार करून दिले जातात. पतंगांची किंमत २ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत आहे. मकरसंक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने पतंग प्रेमींकडून मागणी वाढेल असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.