शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ग्राहकांची वणवण

By admin | Updated: November 10, 2016 22:49 IST

लासलगावी गर्दी : पेठमध्ये बॅँकात कल्लोळ

सायखेडा : ५०० व १०००च्या नोटा बंद झाल्यामुळे ग्रामीण जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला असून, त्याचा प्रत्यय गुरुवारी सायखेडा येथील आठवडे बाजारात पाहायला मिळाला. ५००० किंवा १०००ची नोट दुकानदार घेत नसल्याने ग्राहकांना सुट्या पैशांसाठी वणवण करावी लागली. दोन दिवसात जवळ असलेली सर्व मोड संपल्याने आज नेमका आठवडे बाजार असल्याने दुकानदार सुटे पैसे द्या किंवा पाचशे रुपयांची खरेदी करा, असा आग्रह धरत होते तसेच दहा किंवा पंधरा रुपये किमतीची भाजी खरेदी करण्यासाठी ५००ची नोट दुकानदार कशी घेणार आणि प्रत्येक ग्राहकाला सुटे पैसे कोठून देणार, असा प्रश्न दुकानदारांपुढे असल्याने ग्राहकाला तोंड देताना अवघड झाले. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आपल्याकडे असलेल्या नोटांचे आता काय करायचे या संदर्भात माहिती नसल्याने गोंधळून गेले आहे. काही जण आठवडे बाजारच असल्याने दुकानदारांना नोटा खपविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. एकंदरीतच सायखेडा बाजार आज ५०० व १००० रुपये नोटांनी गाजला आणि चर्चेचा विषय ठरला होता. (वार्ताहर)