शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभागात गैरव्यवहारांचा कळस

By admin | Updated: August 15, 2014 00:33 IST

नगररचना विभागात गैरव्यवहारांचा कळस

 

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार चालतो, बिल्डरांचे दलालच हा विभाग चालवितात, प्लॅन मंजुरीसाठी बिल्डरकडून २०० वार जागा मागण्यात आली, असे अनेक गंभीर आरोप बुधवारी पालिकेच्या महासभेत करण्यात आले. यावेळी नगररचना विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळत त्यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा ठराव करण्यात आला.शेंडे यांच्या प्रतिनियुक्तीवरून नगररचना विभागावर ही वादळी चर्चा झाली. शाहू खैरे यांनी नगररचना विभागातील अधिकारी उन्मत्त असून, सर्वाधिक भ्रष्टाचार याच विभागात चालत असल्याचा आरोप केला. प्रा. कविता कर्डक यांनी आपल्या परिचित विकासकाने वडाळा शिवारात बांधकाम परवानगी मागितली तेव्हा त्यास टाळाटाळ करण्यात आली. नंतर या विकासकाकडून दोनशे वार जागा पालिकेच्या अधिकाऱ्याने मागितली असल्याचे सांगितले. त्याच वेळी अन्य नगरसेवकांनी तक्रारी करतानाच सहायक संचालक शेंडे यांच्या कारभाराविषयी तक्रारी करण्यात आल्या. त्यांनी स्वत:च्या अधिकारात दोन दिवस नगररचना विभाग बंद ठेवला. तसेच मनमानी पद्धतीने नियम लावून विकासकांना वेठीस धरले जाते, मराठीत टिप्पण्या लिहिण्यास सांगितले जाते, असे आरोप करताना काझीची गढी धोकादायक झाल्यानंतर त्यासंदर्भात गढीवर बोलावल्यानंतरदेखील त्यांनी आपल्या कर्तव्यात नमूद नसल्याचे सांगून टाळले होते. पूररेषेत असलेल्या गावठाणातील बांधकामांना परवानगी देण्याच्या महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास तेच अडथळा निर्माण करतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. पालिकेत परसेवेतील अधिकारी नियुक्त झाल्यानंतरचा अनुभव चांगला नसल्याने त्यांच्या नियुक्तीस विरोध करण्यात आला आणि स्थानिक सेवेतील अधिकाऱ्यांकडेच ही जबाबदारी असावी, अशीही मागणी करण्यात आल्याने महापौर अ‍ॅड. वाघ यांनी त्यानुसार स्थानिक अधिकाऱ्याकडेच जबाबदारी द्यावी, अशा सूचना केल्या. चर्चेत संदीप लेनकर, दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, अशोक सातभाई, गुरुमित बग्गा, अशोक मुर्तडक, उत्तमराव कांबळे, शशिकांत जाधव, संजय चव्हाण यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)