शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

महापालिका महासभेत हाणामारी

By admin | Updated: September 10, 2016 00:17 IST

मालेगाव : माजी महापौराकडून स्थायी समिती सभापतीला मारहाण; सभागृहात तणाव

मालेगाव : सभागृहाचे नियम अक्षरश: पायदळी तुडवीत अंदाजपत्रकाच्या इतिवृत्त मंजुरी व महापौरांनी सुचविलेल्या कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करावा या विषयावरून महापौर हाजी मो. इब्राहीम व उपमहापौर युनुस ईसा यांच्यात शाब्दिक चकमकीसह वाद झाला. हा वाद सुरू असताना स्थायी समिती सभापती एजाज बेग यांनी महापौरांची बाजू घेत उपमहापौरांवर टीकाटिप्पणी, अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप करीत असताना माजी महापौर तथा एमआयएमचे शहराध्यक्ष अब्दुल मलिक यांनी भरसभागृहात एजाज बेग यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच त्यांचा भाऊ माजीद मलिक सभागृहात प्रवेश करीत बेग यांना जबर मारहाण केली. यामुळे सभागृह व मनपा परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.नगरसेवक व मनपाचे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र महासभेनंतरही परस्परविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरूच होते. या गदारोळात महापौर हाजी मो. इब्राहीम मात्र हतबल झाले.सदर प्रकारानंतर किल्ला पोलिसांनी मनपा परिसरात धाव घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेग यांनी किल्ला पोलीस ठाण्यात माजी महापौरांसह त्यांच्या भावाविरुद्ध फिर्याद दिल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.महापौर हाजी मो. इब्राहीम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुक्त दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मनपाची महासभा बोलविण्यात आली. महासभेच्या प्रारंभीच नगरसेवक शकील जानीबेग यांनी प्रभाग क्र. २ मध्ये सुविधा पुरविल्या जात नाहीत. शाळा स्थलांतरासह कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. परिणामी नागरी सुविधा पुरविण्यास प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप केला. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे यांनी प्रशासनाने केलेल्या कामकाजाचा आढावा दिला. यावर कॉँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले. अधिकारी काम करीत नसल्याचाही आरोप करण्यात आला. यावेळी महापौर हाजी मो. इब्राहीम यांनी ‘प्रशासन किसी का सुन नही रहा है’ अशी टिप्पणी केली. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. यावर प्रभारी आयुक्त स्वामी यांनी प्रभाग दोनसह इतर तीनही प्रभागाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी स्वतंत्र बैठक घेऊन समस्या व अडचणी जाणून घेण्यात येतील. महासभेत विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त स्वामी यांनी दिला. नगरसेवक मदन गायकवाड यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीने सोयीसुविधाप्रश्नी धरणे आंदोलन छेडले असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावर महापौर हाजी मो. इब्राहीम यांनी विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले. यानंतर महापौर हाजी मो. इब्राहीम यांनी त्यांनी सूचविलेल्या कामांचा अंदाजपत्रकात अंतर्भाव करून अंदाज पत्रकाच्या इतिवृत्ताला मंजुरी द्यावी, असा विषय मांडला. याला उपमहापौर युनुस ईसा यांनी जोरदार आक्षेप घेतला. आम्ही सूचविलेल्या कामांचा अंदाजपत्रकात समावेश केला जात नाही मात्र सहा महिन्यानंतर इतिवृत्तात दुरुस्ती केली जाते. हे चुकीचे असल्याचा आरोप केला. यावेळी स्थायी समिती सभापती एजाज बेग यांनी महापौरांची बाजू घेत उपमहापौर ईसा यांच्यावर टीकाटिप्पणी केली. याचा राग अनावर होऊन माजी महापौर अब्दुल मलिक यांनी बेग यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. यानंतर सभागृहाजवळ उभा असलेला मलिक यांचा भाऊ माजीद मलिक यानेही सभागृहात प्रवेश करून एजाज बेग यांना जबर मारहाण केली. यावेळी कॉँग्रेसचे नगरसेवक खालीद शेख, अग्निशमन दलाचे विभागप्रमुख संजय पवार व इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करीत सभागृहातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या वादातच महापौर हाजी मो. इब्राहीम यांनी महासभा सोमवारपर्यंत तहकूब करीत राष्ट्रगीताची घोषणा केली.महासभेनंतरही सभागृहात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच होत्या. या हाणामारीच्या प्रकारात सभागृहाचे नियम पायदळी तुडविले गेले. नगरसेवकांनी भरसभागृहात एकमेकांच्या अब्रूचे अक्षरश: वाभाडे काढले. यापूर्वीही मनपाच्या महासभेत तलवारी व शस्त्रे आणण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आज दोघा नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारीचा प्रकार घडला. सभागृहात पन्नास टक्के महिलावर्ग असताना शिवीगाळ व मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. महिला नगरसेवकांनी जीव लपवीत सभागृहाबाहेर जाण्याचा मार्ग पत्करला. या घटनेची माहिती किल्ला पोलिसांना मिळताच त्यांनी मनपा आवारात धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. (प्रतिनिधी)