शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रूर पोलीस बाप उठला पोटच्या मुलांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इगतपुरी लोहमार्ग पोलीस कर्मचारी संशयित राहुल विजय मोरे हा तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंटमध्ये आपली ...

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इगतपुरी लोहमार्ग पोलीस कर्मचारी संशयित राहुल विजय मोरे हा तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंटमध्ये आपली दुसरी पत्नी मयुरी व पहिल्या पत्नीपासून जन्मलेला साहील (८) व प्रिया (५) यांच्यासाेबत वास्तव्यास आहे. गेल्या महिनाभरापासून संशयित राहुल हा या दोन्ही चिमुकल्यांना मारझोड करत शारीरिक, मानसिक छळ करत होता. मात्र, शुक्रवारपासून या क्रूर निर्दयी बापाने सगळी मर्यादा ओलांडून आपल्या पोटच्या फुलांसारख्या चिमुकल्यांना वर्दीच्या बेल्टने बेदम मारहाण करत जखमी केले. प्रियाचा चेहरा पूर्णपणे सुजला अन‌् डोळ्यांखाली जखमा झाल्या तर साहिलच्या पाठीवर बेल्टने मारल्याच्या खुणा दिसून येतात. त्याची संपूर्ण पाठ लाल झाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संशयित राहुल व त्याची दुसरी पत्नी मयुरीविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

या घटनेने संपूर्ण समाजमन हादरून गेले असून जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. आई-बाप पोटच्या मुलांच्या जिवावर कसे उठू शकतात? या विचाराने संवेदनशील माणसांची मने सुन्न झाली आहेत. कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्ट्याचे आसूड कोवळ्या जिवांच्या शरीरावर ओढताना या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा फुटला नाही? असा संतप्त प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. या दोघा संशयितांविरुद्ध तीव्र संतापाची लाट इगतपुरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. मानवी हृदय हेलावून टाकणारी ही घटना अंगावर शहारे आणते.

-----

फोटो आर वर १७पोलीस/ १७साहिल/ १७प्रिया नावाने सेव्ह आहे.