शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत घोळ, प्रशासनाची दमछाक

By admin | Updated: January 19, 2017 00:04 IST

रात्रंदिन काम : दोन दिवसांत सुधारित करण्याचे आव्हान

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीतील गोंधळाबाबत एकूण ६८४ हरकती दाखल झाल्या आहेत. मतदार यादीतील हा घोळ मिटविताना मनपा कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक होताना दिसून येत असून, दोन दिवसांत सुधारित मतदार यादी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे रात्रंदिवस कर्मचारी मुख्यालयात दुरुस्तीचे काम करत आहेत. येत्या २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करत प्रारूप याद्या दि. १२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दि. १७ जानेवारीपर्यंत मतदार यादीसंबंधी हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, दि. १७ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या निवडणूक कक्षाकडे एकूण ६८४ हरकती दाखल झाल्या आहेत. प्राप्त हरकतींचा निपटारा करण्यासाठी सहाही विभागात उपआयुक्तांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून, घरपट्टी वसुलीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची मतदार यादीतील घोळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मतदार यादीतील घोळ मिटविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे.