शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

क्रॉम्प्टनप्रकरणी ३0 रोजी सुनावणी

By admin | Updated: June 19, 2015 00:12 IST

क्रॉम्प्टनप्रकरणी ३0 रोजी सुनावणी

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीने संपकाळातही कामगार भरती केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल दाव्यावर येत्या ३0 रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सीटू नेते डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीत गेल्या चाळीस दिवसांपासून सीटू प्रणित युनियनच्या कामगारांनी संप पुकारलेला आहे. आयटक व सीटू युनियन या दोन्ही युनियनपैकी कंपनी व्यवस्थापनाने आयटक युनियनला मान्यताप्राप्त युनियन म्हणून वेतन वाढीचा करार केला आहे. यामुळे सीटूच्या कामगारांनी संप पुकारला असून, गेल्या ४0 दिवसांपासून हा संप सुरू आहे. या संप काळात कंपनी व्यवस्थापनाने नवीन कामगारांची भरती केल्याचे प्रकरण सीटूच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयात आज झालेल्या सुनावणी येत्या ३0 जून रोजी अंतिम निर्णय दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालय नेमके काय निर्णय देईल. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात डॉ. कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या चाळीस दिवसांपासून कामगारांनी संप पुकारलेला असून, यामुळे औद्योगिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. कंपनी व्यवस्थापन समोरासमोर बैठक न लावता कार्यालयीन प्रक्रियेद्वारे दिवस ढकलत असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. कामगारांना गेल्या पंधरा वर्षांपासून बदलता महागाई भत्ता मिळत नाही. कामगारांना त्यांच्या पसंतीची युनियन निवडण्याचा अधिकार मिळणार की नाही हा प्रश्न आहे. डिसेंबर २0१५ रोजी कंपनीतील सुमारे ५00 कामगारांनी आयटक प्रणित युनियनचा राजीनामा दिला आहे. यामुळे क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये सीटू युनियनच्या कामगारांची संख्या अधिक असताना कंपनी व्यवस्थापन हे आयटकबरोबर कसा काय करार करते असा प्रश्नही डॉ. कराड यांनी उपस्थित केला. कंपनी व्यवस्थापन व आयटक युनियन यांनी संगनमत करून स्वत:चे हितसंबंध जोपासण्यासाठी हा करार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. (वार्ताहर)