शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

करवाढप्रश्नी विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:12 IST

स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत केलेल्या करवाढप्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत उमटण्याची शक्यता आहे. करवाढप्रकरणी नागरिकांमधूनही विरोधाची धार तीव्र होऊ लागल्याने भाजपाने बचावात्मक भूमिका घेतली आहे. शनिवारी महासभेपूर्वी भाजपाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

नाशिक : स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत केलेल्या करवाढप्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत उमटण्याची शक्यता आहे. करवाढप्रकरणी नागरिकांमधूनही विरोधाची धार तीव्र होऊ लागल्याने भाजपाने बचावात्मक भूमिका घेतली आहे. शनिवारी महासभेपूर्वी भाजपाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत पाच वर्षांत तब्बल १२० टक्के करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने बुधवारी (दि. १६) झालेल्या सभेत मंजूर केला होता. या भरीव करवाढीचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली असून, त्यातून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले जात आहे. शनिवारी (दि. १९) महापालिकेची महासभा होणार आहे. या महासभेत सदर करवाढीचा प्रस्ताव जादा विषयात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महासभेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. १८) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांकडे झालेल्या बैठकीत करवाढप्रश्नी आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यात आली. शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे यांनी या करवाढीला कडाडून विरोध करत कोणत्याही परिस्थितीत करवाढ होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महासभेत शिवसेनेकडून सत्ताधारी भाजपाला जाब विचारला जाणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनीही करवाढीला पक्षाचा विरोध असल्याचे सांगत करवाढीचा प्रस्ताव महासभेवर आणूच नये, याबाबतचे पत्र महापौरांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले तर राष्ट्रवादीनेही सभागृहात आक्रमक भूमिका घेण्याची तयारी केली आहे.