शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गरम्य वणी परिसरात वावरतात आता गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 23:09 IST

निसर्गरम्य वणी परिसरात वावरतात आता गुन्हेगार

 वणी : परिसरात निसर्गरम्य ठिकाणी फिरायला येणाऱ्या पर्यटकांबरोबरच आता गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही टोळकेही येत असल्याने या भागात गुन्ह्यांची संख्या वाढली असून, डोंगर, धरण परिसर असल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.ठाणे येथील चेकमेट कंपनीतील दरोड्या प्रकरणी नाशिक भागातील दोन संशयितांना वणी परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. चेकमेटचे धागेदोरे वणी परिसरात जुळल्याने संशयितांनी यापूर्वी या भागाची तपासणी करून लुटीचा बनाव रचल्याची वंदता आहे. मंगळवारी (दि. ५) रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेला फोनद्वारे कृष्णगाव परिसरात दोनजण जखमी असल्याची माहिती दिली. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना वणीच्या ग्रामीण रु गालयात दाखल करण्यात आले. संशयितांना विचारणा केली असता अज्ञातांनी कृष्णगाव परिसरात मारहाण करून रक्कम लांबविल्याची माहिती त्यांनी दिली. सदर संशयित मद्याच्या धुंदीत माहिती देत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. संशयितांनी दिलेल्या माहिती अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर संशयित दारूच्या प्रभावाखाली असल्याने ते जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती डॉ. बागुल यांनी पोलीसांना दिली. कृष्णगाव येथील कथित लुटीचे स्थान वणी ग्रामीण रुग्णालयापासुन दोन किलोमीटर अंतरावर आहे. तपासात रात्री १० वाजेच्या सुमारास हा कथित प्रकार घडला. गस्तिपथक त्या भागात असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करणे शक्य झाले. दरम्यान, उपचारानंतर दोघांना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तेव्हा ठाणे येथील चेकमेट कंपनी दरोडा प्रकरणातील हे संशयित असल्याचे पुढे आले़गुजरात राज्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारा अमीन मन्सुरी कृष्णगाव येथे टमाटा व्यापारी म्हणून वास्तव्यास होता. गुजरात पोलिसांनी ओझरखेड धरणावरून त्याला पकडले होते. त्याच्याकड बंदूक मिळून आली होती. तेव्हाच्या तपासात त्याने परिसरात धाडसी चोऱ्या केल्याचे उघड झाले होते. काही दिवसांपूर्वी नाशिक भागातील इंजिनिअरिंग कॉलेजचे दोन विद्यार्थी धरणात बुडून मृत पावले. त्या घटनेबाबत तर्कवितर्क करण्यात आले होते. या प्रतिनिधिक उदाहरणावरून सदर परिसर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या घटकांचा अड्डा असल्याचे बोलले जात आहे. विविध मार्गाने रिलॅक्स होण्यासाठी ठरावीक शहरी भागातील अपप्रवृत्ती या ठिकाणी हजेरी लावतात, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. शहरी भागातील गुंडांना हाताशी धरून सुरगाणा येथील व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार स्मृती आड नाही. माळे फाट्यावरील पेट्रोलपंप लूट प्रकरण अजूनही नागरिकांच्या स्मरणात आहे. वणी व परिसरात सहजगत्या वावरणे किंवा पोलिसांना आव्हान देणारे कृत्य केले तरी चालू शकते अशी गुन्हेगारी घटकांची भूमिका सामान्यांच्या जिवात धडकी भरविणारी आहे. कथित लुटीचा बनाव रचणारे याच श्रेणीतील आहेत. पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्याने संबधितांचे बिंग फुटले व डाव उधळला गेला; मात्र अशा घटकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे असल्याचा सूर परिसरातून उमटतो आहे. ( वार्ताहर )