शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार राकेश कोेष्टीची धिंड

By admin | Updated: December 21, 2016 23:07 IST

सिडकोतील घराची झडती : नागरिकांमध्ये समाधान

सिडको : पंचवटी परिसरात खून करणारा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी यास आज पंचवटी पोलिसांनी अंबड पोलिसांच्या मदतीने सिडकोतील दत्त चौक परिसरात फिरवून त्याची धिंड काढण्यात आली. तसेच यावेळी त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली. अचानक पोलिसांचा ताफा पाहून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. संशयित राकेश कोष्टी हा खून करून फरार झाला होता. त्यास पंचवटी पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले, तर या गुन्ह्यातील तीन अल्पवयीन आरोपींसह सहा सराईत गुन्हेगार अजूनही फरार आहे. याबाबत तपास सुरू असताना पंचवटी व अंबड पोलिसांच्या वतीने बुधवारी कोष्टी राहत असलेल्या सिडको भागातील विजयनगर, दत्तचौक परिसरात आणून त्याची धिंड काढली. तसेच कोष्टी याच्या घराची झडती घेण्यात येऊन खुनात वापरण्यात आलेले हत्यार आहे की नाही याचा शोध पोलिसांनी घेतला. मखमलाबाद रोडवरील क्र ांतिनगर परिसरात भेळभत्त्याची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांवर २७ मे २०१५ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात वाघ यांचा मृत्यू झाला होता. भेळ विक्र ेता वाघ याच्या खुनात संशयित आरोपी म्हणून राकेश कोष्टी यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्कान्वये कारवाईदेखील केली होती; मात्र तपासात अनेक त्रुटी राहिल्याने त्यांच्यावरील मोक्का हा अपर पोलीस महासंचालकांनी हटविला आहे. राकेश कोष्टी याची धिंड अंबडचे पोलीस निरीक्षक मधुकर कड व पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. (वार्ताहर)