शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात दाखल होणार गुन्हे

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

न्यायालयात दाखल होणार गुन्हे

नाशिकजातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून समाज कल्याण विभागाची फसवणूक करणाऱ्या संशयितांविरुद्ध आता थेट जिल्हा न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची मुभा जातप्रमाणपत्र पडताळणी विभागाला मिळाली आहे. या निर्णयामुळे बोगस प्रकरणांचा निपटारा होऊन अशा प्रकरणांना आळा बसणार आहे.नोकरी, शैक्षणिक, तसेच निवडणूक कामासाठी जातीचे पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. असे पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कुटुंबातील सदस्य, तसेच मूळ रहिवासी ठिकाणच्या नोंदीचे अनेक पुरावे सादर करावे लागतात. परंतु कित्येकदा अनेक उमेदवार जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करतात, तर काही लोक कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून समाज कल्याण विभागाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करतात. दरवर्षी अशी अनेक प्रकरणे समितीच्या निदर्शनास येतात. अशी प्रकरणे निदर्शनास आल्यास पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्याची सुविधा होती. परंतु पोलिसांकडे इतर कामांचा असलेला ताण, तसेच मनुष्यबळाच्या अभावाची कारणे देत पोलिसांकडूनही तपासाला दिरंगाई होत होती. त्यामुळे तपासणी तसेच न्यायालयीन प्रक्रियेत अनेक प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने जातप्रमाणपत्र समितीवरही आक्षेप घेतला जात होता.याप्रकरणी समाज कल्याण विभागाने कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि अशी प्रकरणे तत्काळ निकाली निघावी यासाठी थेट न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळावी, असा अभिप्राय शासनाला दिला होता. त्यानुसार शासनाने आता बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची परवानगी समाज कल्याण विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला दिली आहे.