शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

हॅकर सालेचा विरोधात पुणे, गुजरातमध्येही गुन्हे

By admin | Updated: July 5, 2017 01:16 IST

नाशिक : अटक करण्यात आलेला हॅकर दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा याने अकाउंट हॅक केल्याचे समोर आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी राजस्थान येथून अटक करण्यात आलेला हॅकर दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा (२४, रा. जसोलगाव, तहसील पचपदरा, जि़ बाडमेर, राजस्थान) याने महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात येथील नागरिकांचेही अकाउंट हॅक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ त्यापैकी पुणे येथे तीन तर गुजरातमध्ये एक गुन्हा दाखल असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे अनिल पवार यांनी दिली आहे़हॅकर सालेचा याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच जीमेलही हॅक केले असून, नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे का याबाबत चौकशी सुरू आहे़ महिलांसोबत अश्लील संवाद करण्याची विकृती असलेला दीप्तेश याने प्रारंभी मित्रांचेच अकाउंट हॅक केले होते़ यानंतर मुंबई, पुणे, नाशिक येथील महिलांचे अकाउंट हॅक केले व त्यांच्याशी अश्लील संवाद साधला़ त्याचा माग काढून सायबर पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर वायफाय राऊटर, मोबाइल असे साहित्यही जप्त केले़ हॅकर सालेचा यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ पोलीस तपासात आतापर्यंत तीन राज्यांतील सुमारे शंभरहून अधिक नागरिकांचे अकाउंट त्याने हॅक केल्याचे समोर आले असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे़