शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्य आत्महत्त्येप्रकरणी सहा साधूंविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: July 29, 2016 00:13 IST

आडगाव पोलीस ठाणे : तपोवनात गेल्यावर्षी घडली होती घटना

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला तपोवनात आलेल्या साधूंकडे शिष्य म्हणून असलेल्या बजरंगीदास दुर्गाप्रसाद केसरी या २० वर्षीय युवकाला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील सहा साधूंविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत ८ सप्टेंबर रोजी तपोवनात (साधुग्राम) ही घटना घडली होती. या घटनेबाबत उत्तर प्रदेशात राहणाऱ्या मयत बजरंगीदास केसरी याचे वडील दुर्गाप्रसाद केसरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बजरंगीदास केसरी हा वीस वर्षीय युवक साधूंचा शिष्य म्हणून नाशिकला तपोवनात साधुग्राम येथे कुंभमेळ्याच्या कालावधीत आला होता. ८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री त्याला पोटाचा त्रास होऊन उलट्या होऊ लागल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. मयताचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याने विषप्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. सदर घटनेला १० महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर मयताच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांत धाव घेत कुंभमेळा कालावधीत बजरंगीदास याने साधूंकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्त्या केली असल्याची तक्रार केली. त्यानुसार रामकमलदास, विष्णूदास, बलिरामदास, सुमेरी यादव, पन्नासिंग, सफाईदास गुरू ब्रह्मानंद तिवारी सर्व राहणार मरूही, मिरजपूर, उत्तर प्रदेश यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)