शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

------ लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जुने नाशिकमधील वडाळा नाका भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका २४ वर्षीय ...

------

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जुने नाशिकमधील वडाळा नाका भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका २४ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने टोळक्याने हल्ला चढवत गंभीर मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परस्परविरोधी तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

वडाळा नाका भागातील कसाईवाडा वसाहतीमध्ये संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गट समोरासमोर भिडले. संशयित परवेज उर्फ गब्बू निसार शेख (२१), आवेश निसार शेख, सुफियान उर्फ घारु निसार शेख, अरबाज सलीम शेख (२१, रा. चौक मंडई), मोईन इस्लाम शेख (१८, रा. काजीपुरा), यांच्यासह तिघा संशयित साथीदारांनी फिर्यादी मजहर अलाउद्दीन शेख (२४), अजम कुरेशी (दोघेही रा. कसाईवाडा) यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लाकडी दंडुक्याने तसेच लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. यावेळी हल्लेखोरांच्या टोळक्याने मारुती स्वीफ्ट कारचीही तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी परवेज, अरबाज, मोईन या तिघांनाही अटक केली आहे. तसेच आवेश शेख यांच्या फिर्यादीवरून संशयित मझहर कुरेशी, वसीम शेख उर्फ देशू, अजम कुरेशी, तन्वीर कुरेशी यांच्याविरोधातही मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.