शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर नागरी पतसंस्थेच्या संचालकांविरोधात गुन्हे

By admin | Updated: March 11, 2017 01:18 IST

सिन्नर : धनवर्धिनी ठेव खात्यातील रक्कम मुदत संपूनही परत न केल्याने सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाविरोधात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सिन्नर : धनवर्धिनी ठेव खात्यातील रक्कम मुदत संपूनही परत न केल्याने सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाविरोधात अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या धनवर्धिनी ठेव योजनेत महेश पतसंस्थेने पैशांची गुंतवणूक केली होती. मुदत संपल्यानंतर सिन्नर नागरी पतसंस्थेकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. तथापि, सिन्नर नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक व संचालक मंडळाने रक्कम न देता पुन्हा नूतनीकरण करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून या रकमेचे नूतनीकरण करण्यात आले होते. नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतरही महेश पतसंस्थेस ठेवीची रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे सदर संस्थेने सिन्नर न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सिन्नर नागरी पतसंस्थेचे सूरजकुमार प्रकाश शहा, बाळासाहेब बळवंत पवार, राजेंद्र वसंत गोऱ्हे, चंद्रकांत बाबूलाल शहा, अशोक निवृत्ती कासार, जयंत किसन उगले, सतिष गंगाराम कोठावदे, माधव शंकर कापडी, संजित माणिकलाल शहा, सतिष चंपालाल खिंवसरा, सौ. रत्नप्रभा पांडुरंग वाजे, संपतलाल धनराज चोरडिया, बाळासाहेब लक्ष्मण पवार, राजाराम बबन घुगे, वामन बाबूराव जेजूरकर व आप्पासाहेब त्र्यंबकराज जंजिरे या संशयितांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)