शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोहळ्यांविना झाले कोविड सेंटर सुरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:14 IST

नाशिक : गतवर्षी जेव्हा रुग्णालये ओसंडून वाहू लागली, त्यावेळी मनपा हद्दीत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या शुभारंभाचे भव्य ...

नाशिक : गतवर्षी जेव्हा रुग्णालये ओसंडून वाहू लागली, त्यावेळी मनपा हद्दीत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या शुभारंभाचे भव्य सोहळे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले होते. मात्र, आता त्यातील बहुतांश मान्यवर कोरोनाच्या संकटातून स्वत: गेल्याने शासन, प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा कोविड सेंटर्सच्या उद्घाटनाचे सोहळे टाळले. ही उपरती उशिराने का होईना झाली, हेही नसे थोडके, अशीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

गतवर्षी कोविड सेंटरच्या उद्घाटनांना जुलै महिन्यातच प्रारंभ झाला. त्यावेळी प्रत्येक मनपा कोविड सेंटर, तसेच ठक्कर डोमच्या उद्घाटनांचे सोहळे अगदी साग्रसंगीत झाले होते. संबंधित केंद्रातील डॉक्टर्स, कर्मचारी, पदाधिकारी, मान्यवर, उत्सवमूर्ती, पत्रकार, छायाचित्रकार, असा सर्व लवाजमा बरोबर ठेवून भाषणबाजी करून फोटोसेशन करून त्या कोविड सेंटर्सचे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्या कोविड सेंटरच्या प्रारंभासाठी आपण कशा प्रकारे प्रयास केले, ते सांगून त्यातूनही क्रेडिट मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरच्या गत नऊ महिन्यांत बहुतांश मान्यवर, उत्सवमूर्ती, शासन, प्रशासनातील वरिष्ठांना कोराेनाने झटका दिल्यानंतरच त्यांना या आजाराचे गांभीर्य आणि त्याची तीव्रता समजली. काहींना तर कोरोनातून बरे होऊन पुन्हा रुजू होण्यासाठी सुमारे महिनाभराहून अधिक कालावधी लागला. त्यामुळेच आता शहरातील रुग्णालये ओसंडून वाहू लागल्यानंतर कोविड सेंटर मनपाच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. मात्र, यंदा तरी या कोविड सेंटरच्या शुभारंभाचे सोहळे टाळून प्रशासनाने त्यांच्यात थोडीफार तरी माणुसकी बाकी असल्याचे दाखवून दिले आहे.