शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कश्यपी प्रकल्पग्रस्त भरतीचा चेंडू शासनाच्या कोर्टात

By admin | Updated: August 30, 2016 01:17 IST

अहवाल रवाना : महापालिकेने मार्गदर्शन मागविले

 नाशिक : कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मनपाने आपला अहवाल सोमवारी शासनाला रवाना केला असून, कश्यपीसंबंधी महासभेने केलेला ठराव आणि शासनाने नोकरभरतीविषयी आखलेले धोरण याबाबतची माहिती देत प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलविला आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी मागील आठवड्यात मंत्रालयात बैठक होऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने आपला अहवाल तयार करून तो शासनाला रवाना केला आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, सन २००१ मध्ये महापालिका महासभेने ठराव करत कश्यपीचा संबंध संपुष्टात आल्याचे आणि शासनाकडे जमा असलेली ५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय, मनपाने २३ प्रकल्पग्रस्तांना महापालिका सेवेत सामावून घेतले, परंतु कश्यपीचा संबंध उरला नसल्याने शासनाने सदर प्रकल्पग्रस्तांना शासन सेवेत सामावून घेण्याचाही ठराव केला होता. याशिवाय, शासनाने सन २००९ मध्ये एक परिपत्रक काढत महापालिकेला थेट भरतीप्रक्रिया राबविण्यास मनाई केली होती. मात्र, शासनाच्या मान्यतेनुसार जेव्हा कधी भरतीप्रक्रिया राबविली जाईल त्यावेळी कुठल्याही प्रकल्पग्रस्तांना भरतीत प्राधान्य देण्याचे सूचित केले होते. परंतु सद्यस्थितीत शासनाकडून भरती प्रक्रियेवर पूर्णत: बंदी असल्याने आणि महासभेनेही ठराव केला असल्याने शासनानेच याबाबत योग्य मार्गदर्शन करावे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)