शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक हवालदिल : भांडवली कामांसाठी अपुरा निधी

By admin | Updated: April 19, 2017 01:34 IST

नगरसेवक विकासनिधीवर प्रश्नचिन्ह

नाशिक : महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी स्थायी समितीला १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आता नगरसेवकांना उपलब्ध करून द्यायच्या विकासनिधीची चर्चा सुरू झाली असली तरी यंदा भांडवली कामांसाठी अपुरा निधी पाहता विकासनिधीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा नगरसेवकांना जास्तीत जास्त २० लाख रुपयांपर्यंतचा विकासनिधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर झाले आहे. त्यात ८७५.७४ कोटी रुपये महसूली खर्च दाखविण्यात आला असून, ४०३.७५ कोटी रुपये विविध योजनांबाबत मनपाचा हिस्सा अदा करायचा आहे. त्यामुळे एकूण १२७९.४९ कोटी रुपये महापालिकेला अदा करावे लागणार आहेत. त्यात केवळ १३०.५८ कोटी रुपये भांडवली कामांसाठी उरणार आहेत. महापालिकेत प्रतिवर्षी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांतील अत्यावश्यक व मूलभूत कामांसाठी विकासनिधी उपलब्ध करून देण्याची प्रथा पडली आहे. वास्तविक कायद्यातील तरतुदीनुसार नगरसेवकनिधीची तरतूद केवळ २ लाख रुपये आहे. परंतु महापालिकेत आतापर्यंत एक कोटी रुपयांपर्यंत निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या नगरसेवकनिधीची व्याख्या विकासनिधी अशी करत त्यावर रोख आणला. त्यामुळे गेडाम विरुद्ध नगरसेवक असा संघर्षही पहायला मिळाला. अखेर तडजोडीनंतर गेडाम यांनी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी विकासनिधी म्हणून उपलब्ध करून देण्यास संमती दर्शविली होती.गेडाम यांनी सन २०१६-१७ चे १३५७.९६ कोटींचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समितीने त्यात ३८० कोटींची वाढ सुचवत नगरसेवक निधी म्हणून ६० लाख रुपयांची, तसेच महापौर निधी ३ कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोन कोटी व प्रभाग सभापतींसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु महापालिकेची त्यावेळची आर्थिक स्थिती लक्षात घेता महासभेने स्थायीच्या मागणीत कपात करत नगरसेवकनिधीची रक्कम ५० लाखांवर आणली होती, परंतु प्रत्यक्षात नंतर बदलून आलेले आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केवळ ३० लाख रुपयेच उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. यंदा भांडवली कामांसाठी १३० कोटी रुपयेच उपलब्ध होणार आहेत. मागील वर्षी २५६ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा अपुरा निधी पाहता नगरसेवकांना मिळणाऱ्या विकासनिधीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.