शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

डाएट इमारतीचा खर्च साडेतीन कोटींहून १७ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) संस्थेेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या तेरा वर्षांपासून निधीअभावी रखडले असून गेल्या तेरा ...

नाशिक : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) संस्थेेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या तेरा वर्षांपासून निधीअभावी रखडले असून गेल्या तेरा वर्षांत संस्थेला केवळ ८४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे अजूनही इमारतीचे काम अपूर्ण अवस्थेत असून निधीअभावी होत इमारत बांधकामातील दिरंगाईमुळे ३ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजित खर्चात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१८ पर्यंतच्या दरपत्रकानुसार तब्बल चारपटीहून अधिक म्हणजेच तब्बल १७ कोटींपर्यंत वाढ झाली. त्यानंतर डाएटकडून सातत्याने निधीची मागणी होत असतानाही अद्याप निधी उपलब्ध होऊ शकलेला नसल्याने डाएटची इमारत कधी पूर्णत्वास येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या शिक्षणाची मातृसंस्था असलेल्या डाएटची इमारत निधीच्या गेल्या तेरा वर्षांपासून निधीच्या प्रतीक्षेत अपूर्णावस्थेत आहे. डाएटकडून शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा, तालुका तसेच केंद्र स्तरावर विविध विषयांचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात फलटन पॅटर्ननुसार डाएटची सुसज्ज इमारत असावी यासाठी २००५ मध्ये इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गोवर्धन शिवारात डाएटला ५ एकरची प्रशस्त जागाही उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन परिस्थितीत इमारत बांधकामासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाचा आराखडा मंजूर झाल्यानंतर २००८ मध्ये डाएटला शासनाकडून २९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे इमारत बांधकामाला सुरुवातही झाली, परंतु, त्यानंतर थेट २०१२ पर्यंत तीन वर्षात एक रुपयाही निधी मिळाला नाही. २०१२ मध्ये पुन्हा २९ लाख रुपयांचा निधी मिळाला. तर २०१८ मध्ये २६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीत आतापर्यंत इमारतीचा तळमजला बांधून पूर्ण झाला असला तरी पहिला मजला अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. पहिल्या मजल्याच्या भिंती बांधून झाल्या असून निधीअभावी येथे प्लास्टर, विद्युतीकरण व दरवाजे आदी कामे अपूर्णावस्थेत आहे. त्याचप्रमाणे प्लास्टर होऊ शकले नसल्याने पावसाळ्यात इमारतीचे छतही गळत असल्याने या इमारतीत प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त शिक्षण व प्रशिक्षणासंदर्भातील कोणतेही कामकाज होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या तेरा वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतीचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार? आणि त्यासाठी वाढीव खर्चाचा निधी तरी वेळेत उपलब्ध होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इन्फो-

राज्याचा ४० तर केंद्राचा ६० टक्के निधी

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था केंद्र शासन पुरस्कृत संस्था असून या संस्थेला केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के निधी मिळतो. परंतु, भौतिक सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राची असल्यामुळे निधीअभावी रखडलेल्या इमारतीची आणि वाढलेल्या बांधकाम खर्चाची जबाबदारीही केंद्र सरकारचीच असून यापुढे वेळेत निधी प्राप्त झाल्यास अजूनही इमारत पूर्णत्वास जाऊ शकते. मात्र आणखी काही काळ निधीची प्रतीक्षा करावी लागल्यास बांधकाम खर्चात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, २००८ पासून प्रत्येक वर्षी वार्षिक अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात आली असून, केवळ निधीअभावी गुणवत्तेच्या कामात अडचणी जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

इन्फो-

संपूर्ण राज्यातील इमारती अपूर्णावस्थेत

डाएटच्या अपूर्ण अवस्थेतील इमारतीची समस्या केवळ नाशिक जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. तर संपूर्ण राज्यात डाएटच्या ३३ संस्था कार्यरत आहेत. या सर्व संस्थांच्या इमारतींचे बांधकाम फलटन पॅटर्ननुसार एकसमान पद्धतीने करण्यात यावे अशी, शासनाची सूचना आहे. परंतु, गेल्या तेरा वर्षांपासून या इमारतींच्या बांधकामासाठी प्रत्येकी ८४ लाख रुपयांचाच निधी उपलब्ध होऊ शकला आहे. संपूर्ण राज्यभरातील डाएटच्या इमारती अपूर्णावस्थेत असून भौतिक सुविधांच्या अभावामुळे या संस्थांना शिक्षकांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम शहर व शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांमध्येच घ्यावे लागत आहेत. कोरोना काळात या संस्थांनी ऑनलाइन माध्यमातून हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले असले तरी भविष्यात यासाठी भौतिक सुविधांची वानवा निश्चितच भासणार आहे.

इन्फो

डाएट इमारतीसाठी आतापर्यंत काय झाले?

२००५ - शासनाकडून इमारत प्रस्तावास मंजुरी

२००६ - इमारतीसाठी ५ एकर जागा प्राप्त

२००८ - बांधकामासाठी २९ लाख रुपये निधीचा पहिला हप्ता प्राप्त

२०१२ - बांधकामासाठी २९ लाख रुपये निधीचा दुसरा हप्ता प्राप्त

२०१८ - बांधकामासाठी २६ लाख रुपये निधीचा तिसरा हप्ता प्राप्त

२०१८ - सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजित खर्चाचे सुधारित १७ कोटींचे दरपत्रक