शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक, आमदारकी अन् मंत्रिपदही...!

By admin | Updated: January 18, 2017 23:29 IST

दुहेरी लाभ : आठ नगरसेवकांनी चढली विधानभवनाची पायरी

नाशिक : १९९२ पासून महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर गेल्या पाच पंचवार्षिक काळात आठ नगरसेवकांना विधानसभेचीही पायरी चढण्याचे भाग्य लाभले. त्यात महापौरपदापर्यंत झेप घेतलेल्या कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना तर आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. आमदारकी लाभूनही नगरसेवकपदाचा मोह मात्र आठही जणांना सोडता आला नाही.  महापालिकेत सन १९९९ ते २००२ या कालावधीत कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी पहिली महिला महापौर बनण्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शोभा बच्छाव पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शोभा बच्छाव यांनी उमेदवारी केली आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. आमदारकीबरोबरच नंतर डॉ. बच्छाव यांच्याकडे आरोग्य खात्याचे राज्यमंत्रिपदही चालून आले.  मंत्रिपद, कॉँगे्रसचे शहराध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. बच्छाव यांनी मात्र नगरसेवकपदाचा राजीनामा न देता सभागृहाचे सदस्यपद कायम ठेवले. त्यावेळी एकाच व्यक्तीकडे अनेक पदांमुळे टीकाही झाली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नगरसेवक असलेले माजी महापौर वसंत गिते यांनी बाजी मारत आमदारकी मिळविली. तर कॉँग्रेसकडून नगरसेवकपद भूषविणाऱ्या निर्मला गावित यांच्याही पदरात इगतपुरी मतदारसंघातून आमदारकी पडली. गिते-गावित यांनाही आमदारकी मिळूनही नगरसेवकपदाचा मोह सोडता आला नाही. सन २००७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर भाजपाच्या चार नगरसेवकांना आमदारकीची लॉटरीच लागली. सन २००५ ते २००७ या काळात महापौरपद भूषविणारे बाळासाहेब सानप, २००९ ते २०१२ या काळात उपमहापौरपद भूषविणाऱ्या प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे सुपुत्र डॉ. राहुल अहेर यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करत आमदारकी प्राप्त केली. या चौघांनी आमदारकी मिळूनही नगरसेवकपदाचा राजीनामा न देणे पसंत केले. याशिवाय, सन २०१२ च्या निवडणुकीत जनराज्य या पक्षाची स्थापना करत नगरसेवकपदी निवडून आलेले आणि नंतर भाजपात दाखल झालेले अपूर्व हिरे यांनीही शिक्षक मतदारसंघातून विजयश्री मिळवित विधान परिषदेची पायरी चढली. सन २०१२-१७ या काळात तब्बल पाच नगरसेवकांना आमदारकी लाभली.