शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा ठराव विखंडित करणार

By admin | Updated: August 12, 2014 02:03 IST

महापालिकेचा ठराव विखंडित करणार

महापालिकेचा ठराव विखंडित करणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता वीज कंपनीला उपकेंद्रासाठी जागा देण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करणारा महापालिकेचा ठराव शासनपातळीवर विखंडित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, तसे संकेत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहेत. मुंबईत झालेल्या उच्चाधिकार समितीची बैठक पहिल्यांदाच क्षत्रिय यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. अकरा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने क्षत्रिय यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व खात्यांची व त्यांच्या सचिवांची बैठक घेतली. त्यात आजवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याबरोबरच, शासनपातळीवर येणाऱ्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याचा मंजूर आराखडा, त्याला मिळालेला निधी, केंद्र सरकारकडे निधीसाठी करावयाचा पाठपुरावा व सध्या उपलब्ध करून दिलेल्या निधीचा विनियोग याबाबत प्रत्येक विभागाने सादरीकरण केले. वीज कंपनीला उपकेंद्रासाठी जागा देण्यास नाशिक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवून त्यासाठी मोबदल्याची मागणी केली असून, तसा ठरावही करण्यात आला आहे. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वीज कंपनी काम करणार असल्याने व त्याचा उपयोग भाविक, नाशिककर नागरिकांनाच होणार असल्याने त्यासाठी महापालिकेने पैसे मागण्याची बाब शासनाच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी जरी ठराव केला असेल, तरी महापालिका आयुक्तांनी सदरचा ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव सादर केल्यास नगरविकास खात्याकडून तो मंजूर केला जावा, अशा सूचना क्षत्रिय यांनी केल्या आहेत. त्यामुळे वीज कंपनीने उसंत न घेता कामाला सुरुवात करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. कुंभमेळ्याशी संबंधित केली जाणारी कामे, त्यासाठी येणारा खर्च पाहता आणखी काही निकडीची कामे आहे त्याच निधीतून करावयाची असतील तर त्यासाठी शासनपातळीवर असलेले अधिकार जिल्हापातळीवर देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली, जेणेकरून वेळेचा अपव्यय टळून मुदतीत कामे पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व व्यवस्थापनाकडे ‘इव्हेंट’ म्हणून पाहिले जावे, जेणेकरून त्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. यासाठी गरज पडल्यास तांत्रिक सल्लागारांची मदत घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कुंभमेळ्याची कामे मुदतीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीप्रमाणे कामे पूर्ण केली जावीत व होणाऱ्या कामांचा प्रत्येक महिन्याला आढावा घेण्याचेही मुख्य सचिवांनी मान्य केले. या बैठकीस विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी महेश पाटील, रघुनाथ गावडे, महेश पाटील, उदय किसवे उपस्थित होते.