शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दंतवैद्यक सेवा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:49 IST

कोरोना विषाणूंचा प्रसार मुखाद्वारे सर्वात वेगात होत असल्याने दंतवैद्यक सेवा स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बोंडे, सचिव डॉ. समीर सोनार, कम्युनिटी हेल्थचे प्रमुख डॉ. प्रशांत पारखे, डॉ. चेतन चौधरी आणि डॉ. नीरज जमधडे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे फोनवर रु ग्णांना सल्ले

नाशिकरोड : कोरोना विषाणूंचा प्रसार मुखाद्वारे सर्वात वेगात होत असल्याने दंतवैद्यक सेवा स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बोंडे, सचिव डॉ. समीर सोनार, कम्युनिटी हेल्थचे प्रमुख डॉ. प्रशांत पारखे, डॉ. चेतन चौधरी आणि डॉ. नीरज जमधडे यांनी केले आहे.संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सध्या देशात सर्व दंतवैद्यकांनी सेवा बंद ठेवली आहे. बहुतांश दंतवैद्यक फोनवर रु ग्णांना सल्ले देत आहेत. कोरोना विषाणूची लागण ही प्रामुख्याने थुंकी अथवा शिंकण्याने होऊ शकते. दातांच्या सर्व उपचारांमध्ये डेंटिस्ट रु ग्णाशी खूप जवळून काम करतात. बहुतांश उपचारांमध्ये पाण्याचा अथवा हवेचा फवारा मारला जात असल्याने तोंडातील थुंकी हवेत उडते. त्याला अरोसोल म्हणतात. हा एरोसोल पुढील बरेच तास हवेत तसाच राहतो. यामुळे कोरोनाबाधितावर असे उपचार केल्यास डॉक्टर, असिस्टंट तसेच बाकीच्या रु ग्णांनासुद्धा एरोसोलमुळे कोरोना होऊ शकतो. डेंटल चेअर, इन्स्ट्रुमेंट, टेबल, खुर्ची यांसह बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांचा स्पर्श होतो. अशावेळी कोरोनाचे विषाणू अशा जागेवर राहून इतर रुग्णांना बाधित करू शकतात. या जागा वेळोवेळी स्वच्छ केल्या जात असल्या तरी त्यावरील विषाणू शंभर टक्के मरतीलच हे खात्रीने सांगता येत नाही. एरोसोल निर्जंतुक करता येत नाही. त्यामुळे दंतोपचारामध्ये या विषाणूचा संसर्ग डेंटिस्ट, असिस्टंट व मुख्य म्हणजे पुढील अनेक रु ग्णांना होण्याची शक्यता कितीतरी पटींनी जास्त आहे. कोरोना विषाणूची लक्षणे दिसायला बरेच दिवस लागत असल्याने रुग्णाला निरोगी असल्यासारखे वाटते. तरी ते या विषाणूचे कॅरियर असू शकता. अशा वेळी तुमच्या फक्त तपासणीनेदेखील डेंटल चेअर, कन्सल्टिंग टेबल, खुर्ची, रिसेप्शन रूममधील जागा तसेच इतर अनेक ठिकाणी हे विषाणू येऊन इतर रु ग्णांना याची बाधा होऊ शकते.दातांच्या रु ग्णांवर उपचारासाठी इन ९५ मास्क, फेस शिल्ड, गाऊन आदी साधने लागतात. सध्या हे साहित्य कोरोना रु ग्णांना बरे करण्यासाठी झगडणाºया डॉक्टरांना देण्यात येत आहेत. त्यामुळे दातांच्या डॉक्टरांकडे त्याची टंचाई आहे. बहुतांश दंतोपचार हे टाळता येत नसले तरी औषधे घेऊन काही दिवस पुढे ढकलणे शक्य असते. सध्याच्या स्थितीत तसे करणेच हे सर्वांच्याच हिताचे ठरेल. त्यामुळे डेंटिस्टना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रशांत पारखे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDental Care Tipsदातांची काळजीhospitalहॉस्पिटल