शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३२ बळींसह कोरोनाचा उच्चांंक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. ...

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ३२ बळींची नोंद झाली असून, गतवर्षाच्या सर्वाधिक बळींपेक्षाही हा आकडा दोनने अधिक आहे. दरम्यान, बाधित संख्येने ४,६८३ पर्यंत मजल मारली असून, एकूण ३,१९१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,८९४, तर नाशिक ग्रामीणला १,५४३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११९ व जिल्हाबाह्य ८२ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला १६, तर मालेगावला ३ आणि जिल्हाबाह्य २, असा एकूण ३२ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंधापेक्षाही कठोर उपाययोजना अत्यावश्यक असल्याची चर्चा आहे.

इन्फो

गतवर्षापेक्षा २ अधिक

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या बरोबरीने मृत्यूदराचीही वाटचाल उच्चांकाकडे होऊ लागली आहे. गतवर्षी ६ ऑगस्टला ३० तर १६ सप्टेंबरला २९ इतक्या सर्वोच्च बळींची नोंद जिल्ह्यात झाली होती. मात्र, गतवर्षीच्या सर्वाधिक बळींपेक्षाही २ अधिक बळी मंगळवारी नोंदले गेल्याने ही बळींची वाढच जिल्ह्यासाठी घातक ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रलंबित अहवालाची संख्या पुन्हा एकदा सहा हजारांवर अर्थात ६,७९२ वर पोहोचली आहे.

इन्फो

ग्रामीणचे बळी शहरापेक्षा अधिक

जिल्ह्यातील ३२ बळींपैकी तब्बल निम्मे म्हणजे १६ बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरू झाल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावरदेखील अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूण मृत्यूसंख्या अडीच हजाराचा आकडा ओलांडून २,५२९ पर्यंत पोहोचली आहे.

इन्फो

उपचारार्थी ३२ हजारांवर

जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक स्तरावर असून, सध्या ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात १९ हजार २५६, नाशिक ग्रामीणला १० हजार ५२७, मालेगाव मनपाला २,१३४ तर जिल्हाबाह्य २५१ रुग्णांचा त्यात समावेश आहे.