शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगार वेतन भत्त्यापासून वंचित

By admin | Updated: December 24, 2016 01:26 IST

आरोग्य विद्यापीठ : सेवेत कायम करण्याची मागणी

 नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. विद्यापीठात कमी मनुष्यबळ असल्याने जवळपास ३५० ते ४०० कंत्राटी कामगार विद्यापीठात कार्यरत आहे. त्यातील ३५ ते ४० कर्मचारी हे आठ ते दहा वर्षांपासून आहेत. महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठामधील रोजंदारी मजूर, कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना शासनाने २४ जुलै च्या शासननिर्णयानुसार विद्यापीठ सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले आहे. त्याच निर्णयानुसार आरोग्य विद्यापीठातील अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विद्यापीठात सामावून घेण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. विद्यापीठात काम करीत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार उपआयुक्त नाशिक विभाग यांच्या दालनात संयुक्त बैठकदेखील झालेली आहे, परंतु अद्यापही विद्यापीठ प्रशासनाने कुठल्याही प्रकारची विद्यापीठ व संघटना यांच्यात बैठक आयोजित केलेली नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार कायदा अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी विद्यापीठ करीत नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या कामगार विरोधी धोरणामुळे कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे कामगार विरोधी धोरणामुळे कामगारांचा प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याप्रकरणी लक्ष देऊन कंत्राटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून नियमानुसार वेतन द्यावे, जे कर्मचारी विद्यापीठ सेवेत अनेक वर्ष काम करीत आहेत त्यांना कायम करण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ नियमाप्रमाणे देण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)